गावात कोरोना विषाणूचा प्रवेश होऊ नये म्हणून धार्मिक मिरवणुक; 83 जणांना अटक

गावात कोरोना विषाणूचा प्रवेश होऊ नये म्हणून काढण्यात आलेल्या धार्मिक मिरवणुकीत सहभागी झाल्याबद्दल 80 पेक्षा जास्त नागरिकांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली. साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतीज तालुक्यातील लालपूरमध्ये 22 मे रोजी हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले.

    अहमदाबाद : गावात कोरोना विषाणूचा प्रवेश होऊ नये म्हणून काढण्यात आलेल्या धार्मिक मिरवणुकीत सहभागी झाल्याबद्दल 80 पेक्षा जास्त नागरिकांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली. साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतीज तालुक्यातील लालपूरमध्ये 22 मे रोजी हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक विधी करण्यासाठी ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत काही लोकांनी ढोल वाजविले, तर महिलांसह काही जणांनी डोक्यावर कलश घेतले होते. त्यातील पाणी पवित्र असल्याची त्यांची श्रद्धा होती. पोलिसांना मिरवणुकीचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर याचा सोमवारी पत्ता लागला.

    त्यानंतर ओळख पटलेल्या 28 जणांविरुद्ध आणि शंभरहून जास्त अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर कारवाई सुरू असून कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल गेल्या दोन दिवसांत 83 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.