चुकून भारतात आले; सुरक्षा यंत्रणांनी केली पाकिस्तानात पाठवणी

    श्रीनगर : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सीमा भागात होणारी एखादी चकमक ही काही नवी बाब नाही. पण, सध्या भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहेत. भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारत- पाक सीमेवरून दोन पाकिस्तानी तरुणांना अटक केली होती. अटक केलेल्या दोघांना भारतीय लष्काराने पाकिस्तानी प्रशासनाच्या हवाली केले.

    दोघेही चुकून राष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत आले होते. भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून त्यांना बीएसएफने ताब्यात घेतले. सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर विभागाकडून त्यांची चौकशी झाली. चुकून सीमा ओलांडली की यामागे काही दुसरा हेतू होता, याचा तपास पथकाकडून घेण्यता आला.

    मात्र, चुकून सीमा ओलांडून आले होते, असे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चुकून राष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत आलेल्या सहा जणांना यावर्षात भारताने पाकिस्तानी प्रशासनाला सोपवले आहे.