कर्नाटकात मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर निर्बंध ; रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास  मनाई

राज्यातील ध्वनी प्रदूषणाची समस्या रोखण्यासाठी कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सलत, जुमा कुतबा, बयान आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांच्या दरम्यान मशिदीतील लाऊडस्पीकरचा उपयोग करण्यात यावा, असे परिपत्रकात म्हटले आहे.

    बेंगळुरू कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने दर्गा आणि मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावण्यास निर्बंध घालणारे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत राज्यात दर्गा आणि मशिदीत लाऊडस्पीकर लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दिवसा लाऊडस्पीकर लावताना लाऊडस्पीकरचा आवाज हा एअर क्वालिटीच्या मानकांनुसार असावा, त्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

    ध्वनी प्रदूषणवरून निर्णय

    राज्यातील ध्वनी प्रदूषणाची समस्या रोखण्यासाठी कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सलत, जुमा कुतबा, बयान आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांच्या दरम्यान मशिदीतील लाऊडस्पीकरचा उपयोग करण्यात यावा, असे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच मशिदीच्या जवळपास कानठळ्या बसविणारे फटाके फोडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच मशिदीच्या आता मुअज्जिनच्या अँम्लिफायरचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

    भिकाऱ्यांचं कौन्सिलिंग

    यासोबतच सरकारेन मशिद परिसर आणि राज्यात झाडे लावण्याच्या सूचनाही केल्या आहेत. फळ आणि सावली देणारे वृक्ष जागोजागी लावा, तसेच उन्हाळ्यात पशू पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून जागोजागी पाण्याच्या टाकी लावा, तसेच मशीद परिसरातील भिकाऱ्यांची संख्या रोखण्यासाठी भिकाऱ्यांचं कौन्सिलिंग करण्याचे निर्देशही या परिपत्रकातून देण्यात आले आहे.