निवृत्त कॅप्टनचा घरातच मृत्यू ; बाबा झोपले आहेत..,मुलाची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर सर्वजण सुन्न

हरियाणातील यमुनानगरमधील ही धक्कादायक घटना आहे. यमुनानगर सेक्टर १७ मध्ये भारतीय लष्करातील (Indian Army) कॅप्टन रँकचे निवृत्त अधिकारी राम सिंह त्यांचा मुलगा प्रवीण कुमार सोबत राहत होते. राम सिंह यांच्या पत्नीचा आणि मुलीचा यापूर्वीच मृत्यू झाला होता. परंतु त्यांचा मुलगा मानसिक अस्वस्थ असल्यामुळे बाबा सध्या झोपले आहेत, ते थोड्या वेळानं जेवायला उठतील अशी प्रतिक्रिया प्रवीणनं दिली. त्याची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर सर्वजण सुन्न झाले.

गेल्या पाच दिवसांपासून वृद्ध वडिलांचा मृतदेह घरातच पडून होता. परंतु मुलाला त्याचा काय पत्ताच नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हरियाणातील (Haryana) यमुनानगर येथे घडली आहे. मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला, त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. या गंभीर प्रकरणाची चौकशी केली असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला. आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची कल्पना मुलाला नव्हतीच. कारण त्यांचा मुलगा मानसिक अस्वस्थ असल्याची माहिती आहे.

हरियाणातील यमुनानगरमधील ही धक्कादायक घटना आहे. यमुनानगर सेक्टर १७ मध्ये भारतीय लष्करातील (Indian Army) कॅप्टन रँकचे निवृत्त अधिकारी राम सिंह त्यांचा मुलगा प्रवीण कुमार सोबत राहत होते. राम सिंह यांच्या पत्नीचा आणि मुलीचा यापूर्वीच मृत्यू झाला होता. परंतु त्यांचा मुलगा मानसिक अस्वस्थ असल्यामुळे बाबा सध्या झोपले आहेत, ते थोड्या वेळानं जेवायला उठतील अशी प्रतिक्रिया प्रवीणनं दिली. त्याची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर सर्वजण सुन्न झाले.

कशी माहिती झाली उघड?

राम सिंह यांच्या घरातून मृतदेहाची दुर्गंधी येत होती. त्याचबरोबर प्रवीण गुरुवारी गच्चीवर काही कपडे एकत्र करुन आग लावत होता. तो सर्व प्रकार त्याच्या शेजारी रहाणाऱ्या एका महिलेनं बघितला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. प्रवीणची मानसिक अवस्था ठीक नसल्यानं त्यानं जाळपोळीचे प्रकार यापूर्वी देखील केली असल्याची माहिती आहे. आता पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरु केला आहे.