ज्या जीभेने त्याने जय श्री राम म्हणाऱ्यांबद्दल अपशब्द काढले, ती जीभ कापणाऱ्याला 50 हजारांचे बक्षीस; संतांची घोषणा

धार्मिक भावना दुखावल्याच्या आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रय्तन केल्याचा आरोप असलेला अलीगड मुस्लिम यूनिवर्सिटीचा (एएमयू) माजी विद्यार्थी शरजील उस्मानीवर अयोध्येतील साधू-संत संतापले आहेत. शर्जील उस्मानीची जीभ कापणाऱ्याला 50 हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा संतांकडून करण्यात आली आहे. अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनीही उस्मानीवरचा राग व्यक्त करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

    अयोध्या : धार्मिक भावना दुखावल्याच्या आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रय्तन केल्याचा आरोप असलेला अलीगड मुस्लिम यूनिवर्सिटीचा (एएमयू) माजी विद्यार्थी शरजील उस्मानीवर अयोध्येतील साधू-संत संतापले आहेत. शर्जील उस्मानीची जीभ कापणाऱ्याला 50 हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा संतांकडून करण्यात आली आहे. अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनीही उस्मानीवरचा राग व्यक्त करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

    ज्या जीभेने त्याने जय श्री राम म्हणाऱ्यांबद्दल अपशब्द काढले, ती जीभ कापून आणणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. यानंतरही जर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली नाही तर माझ्याकडे शास्त्र आहे तसेच शस्त्रही आहे. अशा अधर्मी व्यक्तीचा अंत करण्यासाठी मी स्वतः जाईल असे ते म्हणाले.

    ३० जानेवारी रोजी पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारी, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली. ‘आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो’, अशाप्रकारची ही गंभीर विधाने केली होती. यावरुन चांगलाच वादंग माजला होता.