Rioting at the Mahakaleshwar temple in Ujjain; The VIP visit of the Chief Minister caused confusion

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओमध्ये मंदिराच्या गेट नंबर 4 वरून भाविकांनी सुरक्षा घेराव तोडला आणि एकमेकांना ढकलून आत प्रवेश करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाला नाही.

    उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या व्हीआयपी दर्शनामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक महिला व मुले जखमी झाले. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने महाकालच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. अशातच, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्यासह बरेच अतिमहत्त्वाचे व्यक्ती मंदिरात दर्शनासाठी पोहोचले.

    सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओमध्ये मंदिराच्या गेट नंबर 4 वरून भाविकांनी सुरक्षा घेराव तोडला आणि एकमेकांना ढकलून आत प्रवेश करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाला नाही.

    परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली जात असल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. बॅरीकेड पडताच मंदिरात जाणाऱ्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.