wasim rizwi

उत्तर प्रदेशचे शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांचे मुंडके छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा करणाऱ्या वकिलाविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

    मुरादाबाद : उत्तर प्रदेशचे शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांचे मुंडके छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा करणाऱ्या वकिलाविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

    कुराण शरीफमधून दहशतवादाचे शिक्षण देणाऱ्या आणि मनुष्याला हिंसक बनविणाऱ्या 26 आयती हटवाव्यात, अशी मागणी रिझवी यांनी एका रिट याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली आहे. याचा अनेक ठिकाणी शिया-सुन्नी पंथियांनी कडाडून विरोध केला आहे.

    याचदरम्यान, मुरादाबाद बार असोसिएशनचे अध्यक्ष अमीरुल हसन जाफरी यांनी वसीम रिझवी यांचं मुंडकं छाटणाऱ्याला ११ लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. अमीरुल हसन जाफरी यांनी 13 मार्च रोजी सिव्हिल लाईन भागातील आयएमए हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले होते.