
पल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असणारे शिवानंद तिवारी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुत्रमोह सोडून देशहिताचा निर्णय घेण्याचा सल्ला दिला. राहुल गांधी हे निरस नेते आहेत. त्यांच्यात लोकांना उत्साहित करण्याची क्षमता नाही, असा आरोपही त्यांनी केला. याबरोबरत माझी ही वक्तव्ये राजद नेतृत्वापर्यंत पोहोचू शकतात. मात्र, लोकशाहीला वाचवण्यासाठी असे लिहायला मी भाग पडलो आहे, अशी पुस्तीही शिवानंद तिवारी यांनी जोडली. त्यांच्या या वक्तव्यांमुळे बिहारमधील राजकीय वातावरण गरम झालं आहे.
पाटणा : राजद उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी महाआघाडीतील आपला सहकारी पक्ष काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असणारे शिवानंद तिवारी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुत्रमोह सोडून देशहिताचा निर्णय घेण्याचा सल्ला दिला.
राहुल गांधी हे निरस नेते आहेत. त्यांच्यात लोकांना उत्साहित करण्याची क्षमता नाही, असा आरोपही त्यांनी केला. याबरोबरत माझी ही वक्तव्ये राजद नेतृत्वापर्यंत पोहोचू शकतात. मात्र, लोकशाहीला वाचवण्यासाठी असे लिहायला मी भाग पडलो आहे, अशी पुस्तीही शिवानंद तिवारी यांनी जोडली. त्यांच्या या वक्तव्यांमुळे बिहारमधील राजकीय वातावरण गरम झालं आहे.
जनतेचा विश्वास प्राप्त करण्यात राहुल गांधींना अपयश
शिवानंद तिवारी फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी म्हटले की जनतेला सोडा, त्यांच्या पक्षातील लोकांचाच राहुल गांधींवर विश्वासच नाही. काँग्रेसची स्थिती नावाडी नसलेल्या नावेसारखी झाली आहे, कोणीच त्याचा वाली उरलेला नाही, असे तिवारी म्हणाले. राहुल गांधी यांच्यामध्ये लोकांना उत्साहित करण्याची क्षमता नाही हे स्पष्ट झालेले आहे. जनतेचा विश्वास प्राप्त करण्यात राहुल गांधींना अपयश आले आहे. पक्षाचा एक गट त्यांना अध्यक्ष करू इच्छितो, यात त्याच लोकांचा स्वार्थही आहे अशी टीकाही तिवारी यांनी केली.
सोनिया गांधींचे केले कौतुक
तिवारी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, आरोग्य ठीक नसतानाही सोनिया गांधी यांनी अध्यक्ष म्हणून पक्ष चालवत आहेत. मी त्यांचा आदर करतो. मला आठवते की सीताराम केसरी यांच्या काळात पक्ष रसातळाला जात असताना त्यांनी काँग्रेसची जबाबदारी सांभाळली आणि पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचविले, मात्र त्या विदेशी असण्यावरून बराच वाद झाला होता अशी आठवणही त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस नेत्याचा पलटवार
राजद उपाध्यक्षांच्या या पोस्टवर काँग्रेस नेते प्रेमचंद मिश्रा यांनी हरकत घेतली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवानंद तिवारी राजदमध्ये आहेत मात्र काँग्रेसबाबत भाजपच्याच भाषेत वारंवार बोलतात. सहकारी पक्षाकडून याप्रकारच्या वक्तव्यांची अपेक्षा नाहीये. राजदने शिवानंद तिवारी यांना पक्षातून हाकलवून लावावे असे प्रेमचंद मिश्रा म्हणाले.