bachpan ka pyar

‘बचपन का प्यार’ मिळवू इच्छिता का? तर गुजरातच्या सूरतमधील एका मिठाईच्या दुकानात पोहोचा. तेथे 580 रुपये प्रतिकिलोच्या दराने ‘बचपन का प्यार’ विकला जातोय. या दुकानाने लोकांच्या ‘बालपणीच्या आठवणी’ जागविण्याच्या उद्देशाने एक विशेष मिठाई तयार केली असून त्याला ‘बचपन का प्यार’ हे नाव दिले आहे.

    सूरत : ‘बचपन का प्यार’ मिळवू इच्छिता का? तर गुजरातच्या सूरतमधील एका मिठाईच्या दुकानात पोहोचा. तेथे 580 रुपये प्रतिकिलोच्या दराने ‘बचपन का प्यार’ विकला जातोय. या दुकानाने लोकांच्या ‘बालपणीच्या आठवणी’ जागविण्याच्या उद्देशाने एक विशेष मिठाई तयार केली असून त्याला ‘बचपन का प्यार’ हे नाव दिले आहे.

    सध्या छत्तीसगडमधील सहदेव या मुलाने गायलेले ‘बचपन का प्यार’ हे गाणे चर्चेत आहे. या दुकानाचे नाव 24 कॅरेट्स असून राधा मिठाईवाला याच्या संचालिका आहेत. आठवणी जागविण्याच्या हेतूने या मिठाईला हे नाव दिले आहे. केवळ मिठाईचे नावच नव्हे तर त्याचा स्वादही अत्यंत विशेष असल्याचे त्या सांगतात.

    या मिठाईमध्ये बबलगम फेल्वरचा वापर करण्यात आला आहे, जो काही काळापूर्वी मुलांचा अत्यंत आवडीचा असायचा. दुकानदाराने बालपणीची आठवण यावी असा प्रयत्न यातून केला आहे. ही मिठाई स्टोअरमध्ये 580 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील एका विद्यार्थ्याचा (सहदेव दिरदो) व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हीडिओत तो वर्गात ‘बचपन का प्यार’ हे गाणे गाताना दिसून येतो. या व्हीडिओने मोठी प्रसिद्धी मिळविली आहे.