आता मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये सुरू होणार RSS च्या शाखा, सरसंघचालकांची घोषणा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ हिंदूंची संघटना नसून सर्वसमावेशक संघटना आहे, हा संदेश देण्यासाठी मुस्लिम विभाग आणि मोहल्ल्यांमध्ये संघाच्या शाखा सुरू करण्याचा निर्णय सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर केला आहे. 

    कोलकाता : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS Shakha) शाखा यापुढे मुस्लिम मोहल्ल्यांमध्येदेखील (Muslim areas) सुरु करण्यात येतील, अशी घोषणा सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हिंदूंप्रमाणे मुस्लिमांनाही सहभागी करून घेण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे.

    मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये संघाच्या शाखा

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ हिंदूंची संघटना नसून सर्वसमावेशक संघटना आहे, हा संदेश देण्यासाठी मुस्लिम विभाग आणि मोहल्ल्यांमध्ये संघाच्या शाखा सुरू करण्याचा निर्णय सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर केला आहे.

    चित्रकुटमध्ये पार पडलेल्या चिंतन शिबीराची मंगळवारी सांगता झाली, त्यावेळी भागवत बोलत होते. RSS ही हिंदुंची संघटना असली तरी त्याचे दरवाजे सर्व धर्मियांसाठी खुले आहेत, हा संदेश देण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.