वीरशैव-लिंगायत समाजाला ओबीसी यादीत आणण्याच्या प्रस्तावाने RSS नाराज

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा(yediyurappa) यांनी त्यांची जात वीरशैव-लिंगायतचा(Veershaiva-Lingayat community ) ओबीसी(OBC) यादीमध्ये आणण्याचा प्रस्ताव सादर करून मोठी खेळी केली आहे. या समाजाच्या विकासासाठी त्यांनी लिंगायत विकास महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्तावही सादर केला आहे. येडियुरप्पांच्या या खेळीला काही जण मास्टरस्ट्रोक म्हणतात तर काही जणांनी पायावर कुऱ्हाड मारली असे मत व्यक्त केले आहे.

या दोन्ही निर्णयांमुळे राज्यात जातीच्या आधारे विभाजन होण्याचा धोका दर्शविला जात आहे. राजकीय वर्तुळातही याची चर्चा आहे. येडियुरप्पांच्या या प्रस्तावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. वीरशैव-लिंगायत समुदायाला ओबीसी यादीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी त्यांच्या मंत्रिमंडळात एकमत नसल्यामुळे आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर अखेरच्यावेळी तहकूब करण्यात आला.

७८ वर्षीय येडियुरप्पाला जातीच्या मुद्यावर खेळी खेळायला कोणी प्रेरित केले याबद्दलही राजकीय पंडितांमध्ये मतभेद आहेत. काहीजणांचा असा युक्तिवाद आहे की त्यांनी लिंगायत यांचे समर्थन त्यांच्या बाजूने मजबूत करून अस्थिर खुर्ची वाचवण्यासाठी हे केले आहे. इतरांना वाटते की हा फक्त एक त्वरित घेण्यात आलेला निर्णय आहे. यामुळे सरकार आणि भाजपमधील त्यांचे संबंध बिघडू लागले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येडियुरप्पा यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदू संघटनांवर विश्वास आहे आणि ते जातीपातीच्या जोखडातून मुक्त व्हावे असे त्यांचे मत आहे. तथापि येडियुरप्पा यांनी हेतुपुरस्सर वा अनावधानाने असे काही केले आहे जे संघानेही गेल्या कित्येक वर्षात केले नाही. त्यामुळे संघाची प्रतिमा मलिन झाल्याचा सूर उमटू लागला आहे.

उल्लेखनीय असेकी, तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमधील लिंगायत नेते एम.बी. पाटील यांनी स्वतंत्र लिंगायत धर्माच्या चळवळीचे नेतृत्व केले. मात्र, त्यावेळी येडियुरप्पा यांनी त्यांच्यावर हिंदू धर्मात फूट पाडल्याचा आरोप केला. आता स्वत: येडियुरप्पा यांनीही तेच केले, असा सूर उमटू लागला आहे.

येडियुरप्पा यानी लिंगायत आरक्षणाचा प्रस्ताव जर ककेंद्राकडे पाठविला तर त्याकडे एनडीएच्या नेत्यांना काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागेल असे जाणकारांचे मत आहे. कारण भविष्यात अशा साहसी भगव्या पक्षाला महागात पडल्या आहेत याकडेही जाणकारांनी लक्ष वेधले. तथापि, येडियुरप्पा यांनी जातीचे पत्ते खेळून हायकमांडला अडचणीत आणले आहे, स्वत:च त्यांच्या जाळ्यात अडकले आहेत की स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे हे येणाला काळच सांगेल असेही जाणकारांचे मत आहे.