रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्ट विरोधात संत एकजूट; चंपतराय यांच्यावर आरोप

रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टमध्ये हनुमानगढी व निर्वाणी आखाड्याचा समावेश न करण्यात आल्यामुळे हिंदू प्रभकार राहिलेले महंत धर्मदास व राम जन्मभूमी न्यासचे वरिष्ठ सदस्य डॉ. रामविलास वेदांती यांनी ट्रस्टविरोधात आघाडी उघडली आहे. दोन्ही संतांनी ट्रस्टमध्ये समावेश न करण्यात आल्याच्या मुद्यावरून नाराजी व्यक्त केली. हनुमानगढीचे महंत धर्मदास यांनी राममंदिर बांधकामाच्या नावावर ट्रस्टमध्ये घोळ केला जात असून सर्व संपत्ती व प्राप्त होणारे दान सर्व काही रामललाचे आहे जेवढेही ट्रस्चटी आणि संत आहेत ते केवळ सेवक आहेत असे असताना ट्रस्टचे सरचिटणीस महंत चंपतराय मात्र मनमानी करीत आहते, असा आरोप त्यांनी केला.

अयोध्या (Ayodhya).  रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टमध्ये हनुमानगढी व निर्वाणी आखाड्याचा समावेश न करण्यात आल्यामुळे हिंदू प्रभकार राहिलेले महंत धर्मदास व राम जन्मभूमी न्यासचे वरिष्ठ सदस्य डॉ. रामविलास वेदांती यांनी ट्रस्टविरोधात आघाडी उघडली आहे. दोन्ही संतांनी ट्रस्टमध्ये समावेश न करण्यात आल्याच्या मुद्यावरून नाराजी व्यक्त केली. हनुमानगढीचे महंत धर्मदास यांनी राममंदिर बांधकामाच्या नावावर ट्रस्टमध्ये घोळ केला जात असून सर्व संपत्ती व प्राप्त होणारे दान सर्व काही रामललाचे आहे जेवढेही ट्रस्चटी आणि संत आहेत ते केवळ सेवक आहेत असे असताना ट्रस्टचे सरचिटणीस महंत चंपतराय मात्र मनमानी करीत आहते, असा आरोप त्यांनी केला.

धूर्त आणि पापी असा केला उल्लेख
ट्रस्टचे सरचिटणीस चम्पत राय यांचा उल्लेख महंत धर्मदास यांनी धूर्त व पापी असाही केला. ते म्हणाले की चंपत राय राममंदिर निर्मितीत अडथळा ठरणार आहेत. हेच ते चंपत राय आहेत ज्यांनी अयोध्येतील साधूंना शिवीगाळ केली होती असेही ते म्हणाले. अयोध्येत अशा व्यक्तीचे दर्शनच होऊ नये, अशी टीकाही त्यांनी केली. ज्या दिवशी ते मला कुठेही दिसतील त्यादिवशी मी आंघोळच करेन असे सांगतानाच अशा पापी व्यक्तीला पाहण्यापेक्षा त्याच्यापासून दूर राहणेच योग्य असेही धर्मदास म्हणाले.

अयोध्येतून पळवून लावा : वेदांती
चंपत राय अँड कंपनीला अयोध्यामधून हाकलून द्यावे लागेल असे मत रामजन्मभूमी न्यासचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रामविलास दास वेदांती म्हणाले. राम मंदिर उभारणीच्या आंदोलनात हनुमानगढी आणि निर्वाणी आखाडा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आता ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा त्याच हनुमानगढ़ी आणि निर्वाणी आखाडा यांना स्थान मिळाले नाही, असे ते म्हणाले. वेदांती म्हणाली की, यापूर्वी अशोक सिंघल यांनी निर्वाणी आखाडाच्या वतीने रामजन्मभूमी न्यासात वेदांतीचे नाव ठेवले होते. आता नव्याने निर्माण झालेल्या ट्रस्टमध्ये निर्वाणी आखाड्याचा समावेशच नाही असे ते म्हणाले.