Salute to conscientiousness; Teacher's camel journey for students

राजस्थानच्या बारमेरमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी चक्क उंटावरून प्रवास केला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल आणि इंटरनेट सुविधेचा अभाव अशा विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षक उंटावर बसून शिकवायला जातात. वाळवंटातील दुर्गम भागात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या शिक्षकांनी उंटांची मदत घेतली आहे. सरकारी शाळांच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली जात आहे.

    दिल्ली : अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच गरीब विद्यार्थ्यांसाठी काही जण पुढाकार घेत आहेत. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

    राजस्थानच्या बारमेरमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी चक्क उंटावरून प्रवास केला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल आणि इंटरनेट सुविधेचा अभाव अशा विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षक उंटावर बसून शिकवायला जातात. वाळवंटातील दुर्गम भागात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या शिक्षकांनी उंटांची मदत घेतली आहे. सरकारी शाळांच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली जात आहे.

    राजस्थान शिक्षण विभागाचे अधिकारी सौरव स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण 75 लाख विद्यार्थ्यांपैकी अनेक जणांकडे मोबाईल नाही आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दोनवेळा घरी जाऊन शिकवावे असे ठरले. आपण सध्या कठीण काळातून जात आहोत. मात्र या काळात आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे शिक्षकांना देखील कमीत कमी अडचणी याव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत” अशी माहिती सौरव स्वामी यांनी दिली आहे. सर्वत्र या शिक्षकांचे कौतुक केले जात आहे. भीमथल या सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रूपसिंह झाकड यांनी देखील शिक्षकांचे कौतुक केले आहे.