कुख्यात खालिस्तानी दहशतवाद्याला शहीद म्हणून सलाम केला; वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर हरभजन सिंगचा माफीनामा

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh)याने कुख्यात खालिस्तानी दहशतवाद्याला शहीद म्हणून सलाम केला. दहशतवाद्यांना अभिवादन केलेल्या या सोशल मिडीयावरील पोस्टमुळे हरभजन वादात सापडला. यानंतर त्याने एक ट्विट करत माफी मागितली आहे.

    चंदीगढ : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh)याने कुख्यात खालिस्तानी दहशतवाद्याला शहीद म्हणून सलाम केला. दहशतवाद्यांना अभिवादन केलेल्या या सोशल मिडीयावरील पोस्टमुळे हरभजन वादात सापडला. यानंतर त्याने एक ट्विट करत माफी मागितली आहे.

    हरभजनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कुख्यात खालिस्तानी दहशतवादी जरनैल सिंग भिंडरावालासह (Jarnail Singh Bhindranwale) त्याच्या साथीदारांचा पोस्ट असणारा फोटो शेअर केला होता. त्यावर ‘शहीदांना सलाम’ असं कॅप्शनही लिहीले होतं. या पोस्टमुळे हरभजन सोशल मिडीयावर चांगलाच ट्रोल झाला.

    1 जून ते 8 जून 1984 च्या दरम्यान अमृतसरच्या पवित्र हरमिंदर सिंग गुरुद्वारा अर्थात सुवर्ण मंदिरावर खालिस्तानी दहशतवाद्यांनी कब्जा केला होता. यावेळी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवत या दहशतवाद्यांचा खात्मा केला. भिंडरावालासह त्याचे साथीदार यात मारले गेले होते. याच गोष्टीला 37 वर्ष झाल्यानंतर त्याबाबत पोस्ट करत हरभजनने भिंडारवाला आणि त्याच्या साथीदार दहशतवाद्यांना शहिद म्हणत त्यांना आदराजंली देखील वाहिली.

    या पोस्टमुळे वाद वाढल्यानंतर हरभजनने ट्विटरवर एक पोस्ट टाकत माफी मागितली. तसेच मी संबधित व्यक्ती आणि त्यांच्या विचारांच समर्थन करत नाही असेही या माफी नाम्यात म्हंटले आहे.

    हे सुद्धा वाचा