mulayam singh yadav

मुलायमसिंह(Mulayamsingh Yaday Is Seek) यांना गेल्या काही वर्षांपासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत.

    समाजवादी पार्टीचे(Samajwadi Party) संस्थापक मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना बुधवारी दुपारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र याबाबत रुग्णालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

    मुलायमसिंह यांना गेल्या काही वर्षांपासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी त्यांना मूत्रपिंडाच्या विकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुलायम यांना कोरोनाचा देखील संसर्ग झाला होता. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.

    मुलायमसिंह राजकीयदृष्ट्या सध्या सक्रिय नाहीत. मात्र समाजवादी पार्टीचे नेते त्यांची भेट घेत राहतात. मुलायम स्वत: अनेकदा सपा कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांशी बोलत असतात.

    कानपूरमध्ये समाजवादी पार्टीने ठिकठिकणी ‘अब युपी में खेला होई’ अशा घोषणा असणारे फलक लावले आहेत. या फलकावर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, समाजवादी पार्टीचं सायकल चिन्हं आणि स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत. या घोषणेद्वारे समाजवादी पार्टीने योगी सरकारविरुद्ध शंखनाद केला आहे. समाजवादी पार्टीचे कानपूर शहरप्रमुख डॉ. इम्रान यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.