kolhapur mpsc exam fake certificate scam crime arrested

2015 मध्ये त्यांच्या मतदारसंघातील से मडी ग्रामपंचायतसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत मीणा यांच्या पत्नी शांतादेवी सदस्य म्हणून निवडून आल्या. सरपंचपदासाठी मीणा यांनी पत्नीच्या सर्व कागदपत्रांवर पालक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. त्यात पाचवी उत्तीर्ण असल्याचेही प्रमाणपत्र होते. शांतादेवी यांच्या विरोधात पराभूत झालेल्या शुगनादेवी यांनी या प्रमाणपत्राला आक्षेप घेतला.

    उदयपूर : पाचवी उत्तीर्ण असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून पत्नीला सरपंचपद मिळवून देणाऱ्या राजस्थानातील भाजपा आमदाराला न्यायालयाने तुरुंगाची वाट दाखविली. अमृतलाल मीणा असे या आमदाराचे नाव असून ते सढुंबर येथून विधानसभेवर निवडून आले आहेत. उदयपूर जिल्ह्यातील सलुंबर विधानसभा मतदारसंघातून अमृतलाल मीणा हे भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.

    2015 मध्ये त्यांच्या मतदारसंघातील से मडी ग्रामपंचायतसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत मीणा यांच्या पत्नी शांतादेवी सदस्य म्हणून निवडून आल्या. सरपंचपदासाठी मीणा यांनी पत्नीच्या सर्व कागदपत्रांवर पालक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. त्यात पाचवी उत्तीर्ण असल्याचेही प्रमाणपत्र होते. शांतादेवी यांच्या विरोधात पराभूत झालेल्या शुगनादेवी यांनी या प्रमाणपत्राला आक्षेप घेतला.

    या प्रकरणात त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. स्थानिक पोलिसांकडून हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे गेले. अधिक चौकशीत पाचवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शांतादेवी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या असल्यामुळे आमदार अमृतलाल मीणा यांनाही आरोपी करण्यात आले.

    परंतु, ते न्यायालयासमोर हजर झाले नाहीत. अखेर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मीणा हे न्यायालयासमोर हजर झाले. त्यांना 23 जुलैपर्यंत कोठडी सुनाविण्यात आली आहे. राज्यातील मागच्या भाजपा सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता अनिवार्य केली होती. विद्यमान काँग्रेस सरकारने 2019 मध्ये दोन विधेयके मंजूर करून ही अनिवार्यता रद्द केली.