Sat under a tree and oxygen level was right; Overcome Kelly Corona in close proximity to nature

हरयाणातील पानीपतमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला वेगळाच अनुभव आला आहे. कोरोनाची लागण झाल्याने तरुणाच्या छातीत दुखू लागले. त्याला श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या. प्रदीप सिंह असे या तरुणाचे नाव आहे. ऑक्सिजन सिलिंडरसाठी त्याने बरेच प्रयत्न केले. मात्र ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने आता जे होईल ते होईल अशा विचाराने प्रदीप शेतात जाऊन बसला. एका झाडाखाली त्याने आश्रय घेतला. तीन दिवसांत त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी पूर्ववत झाली. दहा दिवसांत कोरोनावर मात करून तो अगदी ठणठणीत बरा झाला.

    पानिपत : हरयाणातील पानीपतमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला वेगळाच अनुभव आला आहे. कोरोनाची लागण झाल्याने तरुणाच्या छातीत दुखू लागले. त्याला श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या. प्रदीप सिंह असे या तरुणाचे नाव आहे. ऑक्सिजन सिलिंडरसाठी त्याने बरेच प्रयत्न केले. मात्र ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने आता जे होईल ते होईल अशा विचाराने प्रदीप शेतात जाऊन बसला. एका झाडाखाली त्याने आश्रय घेतला. तीन दिवसांत त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी पूर्ववत झाली. दहा दिवसांत कोरोनावर मात करून तो अगदी ठणठणीत बरा झाला.

    गेल्या काही दिवसांपासून देशातील जवळपास सर्वच राज्यांत ऑक्सिजनसाठी धावाधाव पाहायला मिळत आहे. पानीपतमधील नंगला गावचा रहिवासी असलेल्या प्रदीप सिंहला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यानेही ऑक्सिजन सिलिंडर मिळवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. रुग्णालयांची अवस्था पाहून त्यांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला.

    ऑक्सिजनची पातळी 80 पर्यंत घसरल्यावर प्रदीपसह त्याच्या नातेवाईकांनी सिलिंडरसाठी अनेकांना फोन केले. मात्र काही उपयोग झाला नाही. ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने प्रदीप सिंह शेतात गेले. पुढील 10 दिवस तो दररोज 8 ते 10 तास झाडांखाली बसून असायचा. जेवणदेखील तो तिथेच घ्यायचा.

    तीन दिवसांत त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सामान्य झाले. हळूहळू त्याच्या छातीतील वेदनादेखील कमी झाल्या. श्वास घेण्यातील अडचणी दूर झाल्याने प्रदीपला आत्मविश्वास वाटू लागला. त्याने कोरोना चाचणी करून घेतली. अवघ्या 10 दिवसांत निसर्गाच्या सानिध्यात राहून प्रदीपने कोरोनावर मात केली.