‘Save the cow-save the farmer’ yatra without permission; 70 Congress workers arrested

हमीरपूरचे सदर पोलिस उपअधीक्षक (सीओ), अनुराग सिंह म्हणाले की, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि अन्य नेत्यांनी परवानगी न घेताच आंदोलन केले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. सर्वच काँग्रेसी नेते व कार्यकर्ते कोविड-१९ नियमांचे उल्लंघन करून आंदोलन करीत होते असेही ते म्हणाले.

हमीरपूर :  उत्तर पर्देशात ‘गाय बचाओ-किसान बचाओ’ यात्रे दरम्यान आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या सुमारे ७०  कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परवानगी न घेताच ही यात्रा काढण्यात आली होती.

हमीरपूरचे सदर पोलिस उपअधीक्षक (सीओ), अनुराग सिंह म्हणाले की, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि अन्य नेत्यांनी परवानगी न घेताच आंदोलन केले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सर्वच काँग्रेसी नेते व कार्यकर्ते कोविड-१९ नियमांचे उल्लंघन करून आंदोलन करीत होते असेही ते म्हणाले. या सर्वांना पोलिस संकुलात ठेवण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

तथापि काँग्रेस जिल्हाध्यक्ष नीलम निषाद यांनी पोलिसांनी जवळपास ३०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक केली असा दावा केला. ही यात्रा भरुआ सुमेरपूर गावापर्यंत जाणार होती अशी माहितीही त्यांनी दिली. राज्यातील भाजपा सरकारला न गायीची चिंता आहे न शेतकऱ्यांची अशी टीकाही त्यांनी केली.