‘‘जय श्रीराम बोल! तू हमारे गावं से कमाके कैसे लेके जाता है?’’ वृद्ध मुस्लीम भंगारवाल्याशी हुज्जतबाजी

मुस्लीम भंगारवाला मुस्लीमेत्तर परिसरात जाऊन भंगार गोळा करत असल्याने त्यास जबरदस्तीने जय श्रीराम बोलण्यास भाग पाडले. उज्जैनच्या सेकली गावातील ही घटना असून मुस्लीम भंगारविक्रेत्यानं काही टोळक्यांच्या दबावामुळे जय श्री राम म्हटले.

  इंदौर (Indore) : मुस्लीम दुकानदार श्रीनाथ नावाने डोसा विक्रीचे दुकान चालवित असल्याने काही हिंदुत्ववाद्वांनी दुकानाची तोडफोड केली. मथुरा येथील ही घटना ताजी असतानाच इंदौरमधील उजैन तालुक्यात धक्कादायक घटना पुढे आली. यामध्ये काही हिंदुत्ववादी युवकांच्या टोळक्याने गावात भंगार गोळा करण्यास आलेल्या मुस्लीम वृद्धास दमदाटी केली. एवढचं काय तर टोळक्याने भंगारवाल्यावर ‘जय श्रीराम’चा जयघोष का करत नाही? असा प्रश्न केला.

  ‘‘तुम अगर हिंदूओं को नहीं चाहते, तो गावं में घूसे कैसे? तू हमारे गावं से कमाके कैसे लेके जाता है? जय श्रीराम बोलने में तेरे को क्या दिक्कत है?’’ युवकांच्या टोळक्याने असे नानाविध प्रश्न विचारत भंगारवाल्यास घेरले. अखेर भंगारवाल्याने त्याने ‘जय श्रीराम’चा जयघोष करून आपली सुटका करून घेतली. काँग्रेसचे वरिष्ठ नेता दिग्विजय सिंग यांनी घटनेचा व्हिडिओ ट्विटर हँडलवर टाकल्यानंतर मध्य प्रदेश सरकारमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

  माहितीनुसार, मुस्लीम भंगारवाला मुस्लीमेत्तर परिसरात जाऊन भंगार गोळा करत असल्याने त्यास जबरदस्तीने जय श्रीराम बोलण्यास भाग पाडले. उज्जैनच्या सेकली गावातील ही घटना असून मुस्लीम भंगारविक्रेत्यानं काही टोळक्यांच्या दबावामुळे जय श्री राम म्हटले. तरीही, या त्यास मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या भंगारवाल्या व्यक्तीस पुन्हा गावात पाय ठेऊ न देण्याची धमकी या समाजकंटकांनी दिली होती. त्यानंतर, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  संबंधित घटनेवरुन काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेश सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मामू म्हणत प्रश्न विचारला आहे. हे गुन्हेगारी कृत्य नाहीये का? असा सवाल दिग्विजय सिंह यांनी डिजीपी यांनाही विचारला आहे. या युवकांवर कारवाई कधी होणार, आता, हद्द पार होतेय…. असेही सिंह यांनी म्हटले.

  ”तुम हिंदु नाम लगाकर दुकान क्यों चलाते हो?” डोसा विक्रेत्याच्या गाडीची तोडफोड
  देविराज पंडित नावाच्या एका Facebook userने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, जमावाकडून डोसा विक्रेत्याच्या दुकानाची तोडफोड करण्यात आल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर सध्या वेगाने हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, मुथरा येथील विकास बाजारचा हा व्हिडिओ असून एका मुस्लीम डोसा विक्रेत्याच्या गाड्यावर तोडफोड केल्याची कॅमेऱ्यात दिसून येते. तुम्ही हिंदू नाव लावून दुकान का चालवता, ते नाव पाहूनच हिंदूधर्मीय लोक इच्छा नसतानाही येथे खायला येतात, असे त्यास मारहाण करण्यांनी म्हटले आहे.