अहमदाबादमध्ये आजपासून शाळा सुरू, एका वर्गात बसणार एवढेच विद्यार्थी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारांनी घेतला होता. मात्र त्यानंतर कोरोना कहर ओसरू लागला आणि वेगवेगळ्या राज्यांनी टप्प्याटप्प्याने आपापल्या राज्यातील शाळांबाबत धोरण आखायला सुरुवात केली. त्यानुसार अहमदाबाद मधील शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अहमदाबाद मध्ये आज पासून दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू होणार आहेत. गेल्या सात महिन्यांपासून कोरोना संकटामुळे बंद असणाऱ्या शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच उत्साह बघायला मिळतोय.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारांनी घेतला होता. मात्र त्यानंतर कोरोना कहर ओसरू लागला आणि वेगवेगळ्या राज्यांनी टप्प्याटप्प्याने आपापल्या राज्यातील शाळांबाबत धोरण आखायला सुरुवात केली. त्यानुसार अहमदाबाद मधील शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून अहमदाबादमधील दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलंच उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्रापाठोपाठ अहमदाबादमध्येही कोरोनाने कहर केला होता. त्यामुळे कोरोना संकटावर मात करणं हे सरकारसमोरचं मोठं आव्हान होतं.

सध्या कोरोना लसीला मंजुरी मिळाली असून त्याचं वितरणाचं नियोजन अखेरच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं दहावी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांमध्ये उपस्थिती लावणं विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य नसेल.

विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या बॅचेस केल्या जातील आणि बॅचनुसार विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येईल. एका वर्गाच्या दोन ते तीन बॅचेस करण्यात येतील आणि एका वेळी एका वर्गात दहा पेक्षा अधिक विद्यार्थी असणार नाहीत, अशा प्रकारची खबरदारी घेण्यात येणार आहे. आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचे की नाही, याची निवड पालक करतील आणि मुलांना शाळेत न पाठवण्याचा पर्यायदेखील खुला असेल.

कोरोना संदर्भात केंद्र सरकारने घालून दिलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करणं विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र तब्बल दहा महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्यामुळे आणि पुन्हा एकदा शाळेतले मित्र-मैत्रिणी भेटणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळतो आहे.