ढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू

या घटनेची माहिती मिळताच SDRF चं पथक आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच SDRF च्या पथकाला उधमपुरच्या नदीत अडकलेल्या तरूणीला महापूरातून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. तसेच हे रेस्क्यू ऑपरेशन जवळपास एक तास सुरू असल्याची माहिती सर्जन शुक्ला यांनी दिली आहे.

    ढगफुटीमुळे जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक जणांचं जनजीवन विस्कळीत झालं असून उत्तराखंडमध्ये जवळपास 80 गावांचा संपर्क तुटला आहे. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये सुद्धा 1 ऑगस्टपर्यंत कोसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु जम्मू-काश्मीरमधील एका महापूरात अडकलेल्या तरूणीला SDRF च्या पथकाने बचाव कार्य केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

    या घटनेची माहिती मिळताच SDRF चं पथक आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच SDRF च्या पथकाला उधमपुरच्या नदीत अडकलेल्या तरूणीला महापूरातून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. तसेच हे रेस्क्यू ऑपरेशन जवळपास एक तास सुरू असल्याची माहिती सर्जन शुक्ला यांनी दिली आहे.

    जम्मूमधील किश्तवाड जिल्ह्यामध्ये बुधवारी ढगफुटी झाल्यामुळे महापूर आला होता. यामध्ये सहा ते आठ घरं महापूरात वाहून गेली होती. मातीच्या ढिगाऱ्याखालून 8 जणांचे पार्थिव बाहेर काढण्यात आले. करगिलमध्ये दोन्ही जागेवर ढगफुटी झाल्यामुळे मिनी पावर प्रोजेक्ट आणि काही घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.