केंद्रीय मंत्री नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी सात जणांना अटक; ३ एफआयआर नोंदवले

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्याप्रकरणी आता कारवाई सुरू झाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत पश्चिम बंगाल पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, ३ एफआयआर नोंदवले गेले आहेत. पश्चिम बंगाल पोलिसांनी दगडफेक प्रकरणी देखील अज्ञात लोकांविरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत. याशिवाय अन्य एक एफआयआर भाजपा नेता राकेश सिंह यांच्याविरोधातही नोंदवला गेला आहे. ज्यांच्यावर जमावाला भडकवण्याचा आरोप आहे.

कोलकाता (Kolkata).  पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्याप्रकरणी आता कारवाई सुरू झाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत पश्चिम बंगाल पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, ३ एफआयआर नोंदवले गेले आहेत. पश्चिम बंगाल पोलिसांनी दगडफेक प्रकरणी देखील अज्ञात लोकांविरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत. याशिवाय अन्य एक एफआयआर भाजपा नेता राकेश सिंह यांच्याविरोधातही नोंदवला गेला आहे. ज्यांच्यावर जमावाला भडकवण्याचा आरोप आहे.

पश्चिम बंगाल पोलिसांच्या मते , जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्याला झेड सुरक्षेशिवाय बंगाल पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली होती. नड्डा यांचा ताफा जाणार त्या मार्गावर आणि कार्यक्रमस्थळी चार अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आठ पोलीस उपअधीक्षक, ८ पोलीस निरीक्षक, ३० पोलीस अधिकारी, ४० आरएएफ, १४५ शिपाई, ३५० सीव्हीचा बंदोबस्त होता.

जे. पी. नड्डा जेव्हा डायमंड हार्बरकडे जात होते. तेव्हा त्यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक झाली व हल्ला झाला. यामध्ये जेपी नड्डा सुरक्षित राहिले पण भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अन्य नेते जखमी झाले. या हल्ल्यानंतर भाजपाने आक्रमक होत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका करणं सुरू केलं आहे.