कोरोना आला अन् संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त करुन गेला, एकाच परिवारातल्या ७ जणांचा झाला मृत्यू

कोरोनाच्या कचाट्यात सापडून एकाच कुटुंबातल्या सात जणांचा(7 people dead from one family) मृत्यू झाला आहे.

    देशात कोरोना रुग्णांची(Corona Patients) संख्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण कुटुंब अशातच एक दुःखद बातमी समोर येत आहे. कोरोनाच्या कचाट्यात सापडून एकाच कुटुंबातल्या सात जणांचा(7 people dead from one family) मृत्यू झाला आहे.

    उत्तर प्रदेशातल्या लखनौजवळच्या इमलिया गावातल्या एका कुटुंबाने आपल्या सात कुटुंबियांना गमावलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल ते १५ मे या २० दिवसांच्या कालावधीमध्ये ओमकार यादव यांच्या कुटुंबातल्या ७ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ६ जणांना कोरोनाची लागण झाली होती तर एकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचाही मृत्यू झाला.

    गावचे प्रमुख मेवाराम यांनी सांगितलं की, एका गावात एवढे मृत्यू होत आहेत याबद्दल चौकशी व्हायला हवी. मात्र, गावात स्वच्छतेची सुविधाही नाही. त्यांनी सरकारवर असेही आरोप केले आहेत की, मृत व्यक्तींना योग्य उपचार मिळाले नाहीत. त्यांना ऑक्सिजन बेड्स मिळाले नाहीत. गावात ५९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. ते सगळे स्वत:ची काळजी स्वत:च घेत आहेत.