Seven young men dancing in the Atal tunnel; Vehicles seized by Kelly police

अटल बोगद्यामध्ये गाडी थांबून डान्स करत पर्यटकांबरोबर हुल्लडबाजी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बोगद्यामध्ये नाचणाऱ्या तरुणांचे फोटो आणि व्हिडीओ पर्यटकांनी सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सात तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या तीन गाड्या जप्त केल्या आहेत. तसेच अशाप्रकारे पर्यटकांना त्रास देणाऱ्या आणि वाहतूककोंडीसाठी जबाबदार ठरणाऱ्यांवर आमची नजर असून अशाप्रकारे कोणी दंगा करताना दिसल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

शिमला :  हिमाचल प्रदेशमधील रोहतांग येथील अटल बोगदा पाहण्यासाठी आणि येथील थंडीचा आनंद घेण्यासाठी सध्या देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत आहेत. मात्र या बोगद्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गोंधळ घालून पर्यटकांना त्रास देणाऱ्या तरुणांची टोळकी पर्यटकांना त्रास देत असल्याच्या घटना समोर येत आहे.

अशाच एका प्रकरणामध्ये अटल बोगद्यामध्ये गाडी थांबून डान्स करत पर्यटकांबरोबर हुल्लडबाजी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बोगद्यामध्ये नाचणाऱ्या तरुणांचे फोटो आणि व्हिडीओ पर्यटकांनी सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी सात तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या तीन गाड्या जप्त केल्या आहेत. तसेच अशाप्रकारे पर्यटकांना त्रास देणाऱ्या आणि वाहतूककोंडीसाठी जबाबदार ठरणाऱ्यांवर आमची नजर असून अशाप्रकारे कोणी दंगा करताना दिसल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या हिवाळ्याच्या मौसमामध्ये या प्रदेशातील पर्यटकांची संख्या जास्त असते. त्यातच यंदा पहिल्यांदाच पर्यटकांना अटल बोगदा पाहता येणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूकही वाढली आहे. असं असतानाच वाहतुककोंडी करणाऱ्यांना सोडले जाणार नाही असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.