आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के ; ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे अनेक ठिकाणी पडझड

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता. पहिल्या तीव्र झटक्यानंतर नंतर लागोपाठ दोन हादरे जाणवले.

    आसामसह काही राज्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. आसामच्या सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी लागोपाठ दोन झटके जाणवले. त्यामुळे लोक आपापल्या घराबाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती.

    राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता. पहिल्या तीव्र झटक्यानंतर नंतर लागोपाठ दोन हादरे जाणवले. एक ७ वाजून ५५ मिनिटाला तर त्यानंतर थोड्या वेळाने दुसरा.

    भूकंपाच्या या धक्क्यांची तीव्रता पहिल्या धक्क्याच्या तुलनेत कमी होती. ७ वाजून ५५ बसलेला झटका ४.३ रिश्टर स्केल, तर दुसरा ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.आसामच्या मुख्यमंत्री सोनभद्र सोनवाल हे सर्व जिल्ह्यांचा आढावा घेत असून, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

    आसामला भूकंपाचा मोठा झटका बसला आहे. सर्वजण सुखरूप असतील अशी मी प्रार्थना करतो आणि नागरिकांनी सतर्क राहावं. सर्व जिल्ह्यांचा आढाव घेत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सोनवाल यांनी दिली.