ramesh jarkiholi

व्हिडिओमधील व्यक्ती मी नाही. असे आरोप माझ्यावर लादले जाऊ शकतात असे हायकमांडेन मला पूर्वीच सांगितले होते. यासाठी कायदेशीर मदत घेण्याचा सल्ला दिला होता. तथापि, हे आरोप खोडून काढण्यासाठी लढणार आहे. हा वाद निर्माण करण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. बेंगळूरमधील यशवंतपूर आणि हुळीमावु या दोन ठिकाणी हा कट रचण्यात आल्याचा दावा देखील रमेश जारकीहोळी यांनी केला. 

    बंगळूर : नोकरीच्या आमिषाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच माजी मंत्री जारकिहोळी यांची एक सेक्स सीडी देखील व्हायरल झाली आहे. यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान माजी मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत माझी राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी हा कट असल्याचे आरोप केले.

    निवासस्थानी झालेल्या पत्रपरिषदेत जारकिहोळी यांनी व्हिडिओ आणि सीडी बनावट असून ते माझ्याविरूद्ध रचलेला कट आहे. मी निर्दोष आहे, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रूही तरळले.

    व्हिडिओमधील व्यक्ती मी नाही. असे आरोप माझ्यावर लादले जाऊ शकतात असे हायकमांडेन मला पूर्वीच सांगितले होते. यासाठी कायदेशीर मदत घेण्याचा सल्ला दिला होता. तथापि, हे आरोप खोडून काढण्यासाठी लढणार आहे. हा वाद निर्माण करण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. बेंगळूरमधील यशवंतपूर आणि हुळीमावु या दोन ठिकाणी हा कट रचण्यात आल्याचा दावा देखील रमेश जारकीहोळी यांनी केला.

    दरम्यान, सीडीमध्ये सहभागी असलेल्या मुलीला परदेशात पाच कोटी आणि दोन फ्लॅट दिले आहेत. माझ्याविरूद्ध कट रचण्याचा सौदा यशवंतपूरमधील ओरियन मॉलजवळील फ्लॅटमध्ये करण्यात आला. माझी प्रतिमा आणि राजकीय कारकीर्द बिघडू नये यासाठी मुख्यमंत्री बी.एस. येदीयुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री व जद (एस) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.