प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

बहिण-भावाचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. ज्यावर संशय घेणे कोणालाही अशक्य आहे. मात्र, एका विकृत मनोवृत्तीच्या मद्यधुंद भावाने आपल्या विवाहित बहिणीवरच बलात्कार केला असे, सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही; मात्र, ही घटना उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जिल्ह्यात 23 डिसेंबर रोजी घडली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित बहिणीने तिच्या आई-वडिलांना सदर वृत्तांत सांगितला; पण त्यांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. अखेर संतापलेल्या पीडितेेने थेट पोलिस ठाणे गाठून आपली आपबिती सांगिती. ती ऐकूण पोलिससुद्धा हादरून गेले.

मोरादाबाद (Moradabad).  बहिण-भावाचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. ज्यावर संशय घेणे कोणालाही अशक्य आहे. मात्र, एका विकृत मनोवृत्तीच्या मद्यधुंद भावाने आपल्या विवाहित बहिणीवरच बलात्कार केला असे, सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही; मात्र, ही घटना उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जिल्ह्यात 23 डिसेंबर रोजी घडली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित बहिणीने तिच्या आई-वडिलांना सदर वृत्तांत सांगितला; पण त्यांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. अखेर संतापलेल्या पीडितेेने थेट पोलिस ठाणे गाठून आपली आपबिती सांगिती. ती ऐकूण पोलिससुद्धा हादरून गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २३ डिसेंबर रोजी घडली आहे. पीडित महिलेचा पती बाहेर असताना मोठा भाऊ तिच्या घरी आला. त्यावेळी तो मद्याधुंद अवस्थेत होता. यावेळी त्याच्यासोबत मद्यपान केलेला मित्रही होता. बहीण एकटी असल्याचं बघून भावाने तिच्या बलात्कार केला. तर त्याच्या मित्रानं व्हिडीओ शूट केला. त्यानंतर झालेल्या प्रकाराची कुणाकडे वाच्यता केल्यास व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर भावाचं हीन कृत्य थांबलं नाही. त्यानंतर तो पीडितेवर लक्ष ठेवायचा तसेच छळही करू लागला. तर दुसरीकडे पीडितेचे आईवडिलही तिच्या पोलिसात न जाण्यासाठी दबाव आणू लागले. त्यामुळे पीडितेचा संयम सुटला आणि तिने पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. महिलेनं तक्रार दिल्यानंतर मोरादाबाद पोलिसांनी सोमवारी पीडितेचा भाऊ व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.

“ही घटना घडल्यानंतर आपण पतीला सांगितलं. त्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पण, कुटंबीयांनी सामाजातील प्रतिष्ठा खराब होईल, असं सांगत तक्रार न करण्यासाठी दबाव टाकला. मात्र, आरोपी भाऊ घराच्या परिसरातच फिरायला लागला. तसेच छळ करू लागला आणि धमकी देऊ लागला. त्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार केली,” असं महिलेनं फिर्यादीत म्हटलं आहे. “मुख्य आरोपीसह त्यांच्या मित्राविरुद्ध बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल,” असं सिव्हील लाईन पोलीस ठाण्याचे प्रमुख दर्वेश कुमार यांनी सांगतिलं.