shanti dhariwal

राजस्थानचे मंत्री(rajasthan minister) शांती धारीवाल(shanti dhariwal) यांनी म्हटले आहे की, भ्रष्टाचार(corruption) भारताच्या कुंडलीतच आहे. ज्या राजाच्या नावावर देशाचे नाव पडले आहे त्या राजाच्या कुंडलीतच भ्रष्टाचार होता तर राज्यातून भ्रष्टाचाराचे उच्चाटन होणार कसे? आज सर्वत्र भ्रष्टाचार आहे. कमी असो वा जास्त परंतु प्रत्येक ठिकाणी आहे व आपल्यापेक्षा अन्य देशात तर सर्वाधिक आहे.

    जयपूर: भ्रष्टाचार(corrupti0n) हा भारतातला(corruption in India) सगळ्यात मोठा विषय आहे. तो मुळापासून नष्ट करण्याचा दावा प्रत्येक सरकार करीत असते.मात्र राजस्थान विधानसभेत जेव्हा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चा झाली तेव्हा अनेक आमदारांनी तो नष्ट केलाच जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले.

    राजस्थान सरकारमधील संसदीय कामकाजमंत्री व शहरी विकास मंत्री शांती धारीवाल यांनी तर राजा दुष्यंत आणि शकुंतला यांची कथा सांगत भ्रष्टाचार भारताच्या कुंडलीतच असल्याचा दावा केला. उल्लेखनीय असे की, काही दिवसांपूर्वी धारीवाल यांच्यासोबत एका कार्यक्रमाचे उद्घाटन करणारा जयपूर बस सर्व्हिस सेवेचा व्यवस्थापकीच संचालकच ४ लाखांची लाच घेताना गजाआड झाला होता.

    राजस्थानचे मंत्री शांती धारीवाल यांनी म्हटले आहे की, भ्रष्टाचार भारताच्या कुंडलीतच आहे. ज्या राजाच्या नावावर देशाचे नाव पडले आहे त्या राजाच्या कुंडलीतच भ्रष्टाचार होता तर राज्यातून भ्रष्टाचाराचे उच्चाटन होणार कसे? आज सर्वत्र भ्रष्टाचार आहे. कमी असो वा जास्त परंतु प्रत्येक ठिकाणी आहे व आपल्यापेक्षा अन्य देशात तर सर्वाधिक आहे.

    अपक्ष आमदारांचा पलटवार

    चर्चेदरम्यान अपक्ष आमदार संयम लोढा यांनी मंत्री धारीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. राजस्थानात भ्रष्टाचाराविरोधात जेवढी कारवाई झाली त्यापेक्षा अर्धी कारवाई शहरी विकास मंत्रालयात झाल्याची तोफ डागली. विद्यमान सरकारच अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्याची परवानगीच देत नाही, असा आरोपही त्यांनी केला. अन्य एक अपक्ष आमदार राजेंद्र गुना यांनी निवडणुकीपासूनच भ्रष्टाचाराचा प्रारंभ होतो, असा दावा केला. निवडणुका लढविण्यासाठी जी खर्चाची मर्यादा आखून दिली आहे तेवढ्या पैशात येथील एकही आमदार निवडून आलेला नाही, असेही परखड मत त्यांनी व्यक्त केले.