Shaved Blade Made Woman's Cesarean VIII Failed Wardboy Delivers Women; There is no doctor, no nurse, two nurses and a ward boy

सिझेरियनसाठी लागणारी साधनं नसल्याने या वॉर्डबॉयने साध्या ब्लेडने तिच्यावर शस्त्रक्रीया केली. मात्र शस्त्रक्रियेनंतर या महिलेला प्रचंड रक्तस्राव झाला. रक्तप्रवाह थांबत नसल्याने या महिलेच्या पतीने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, आसपास कोणतेही रुग्णालय नसल्याने १४९ किमी अंतरावर असलेल्या लखनौ येथील रुग्णालयात या महिलेला नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. योग्य उपचार न मिळाल्याने आधीच या महिलेच्या बाळाचाही मृत्यू झाला.

    सुलतानपूर : दाढी करायच्या ब्लेडने एका महिलेचे सिझेरियन केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील सैनी गावातील एका नर्सिंग होममध्ये घडली आहे. आठवी नापास वॉर्डबॉयने महिलेची सिझेरियन पद्धतीने प्रसूती केली. यात त्या महिलेचा व तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.

    सैनी गावातील एका गरोदर महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. यामुळे तिच्या पतीने तिला सैनी गावातील माँ शारदा नर्सिंग होममध्ये दाखल केले. या रुग्णालयात शस्त्रक्रीयेसाठी लागणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नव्हत्या. असे असताना येथे काम करणाऱ्या वॉर्डबॉयने या महिलेची सिझेरियन पद्धतीने प्रसुती करण्याचा निर्णय घेतला.

    मात्र, सिझेरियनसाठी लागणारी साधनं नसल्याने या वॉर्डबॉयने साध्या ब्लेडने तिच्यावर शस्त्रक्रीया केली. मात्र शस्त्रक्रियेनंतर या महिलेला प्रचंड रक्तस्राव झाला. रक्तप्रवाह थांबत नसल्याने या महिलेच्या पतीने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.
    मात्र, आसपास कोणतेही रुग्णालय नसल्याने १४९ किमी अंतरावर असलेल्या लखनौ येथील रुग्णालयात या महिलेला नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. योग्य उपचार न मिळाल्याने आधीच या महिलेच्या बाळाचाही मृत्यू झाला.

    बाळ आणि पत्नी दोघांनाही गमावल्यामुळे मृत महिलेच्या पतीने माँ शारदा नर्सिंग होम विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रुग्णालयाची तपासणी केली असता धक्कादा.क वास्तव समोर आले. या रुग्णालयात एकही डॉ़क्टर नव्हता. आया, दोन नर्स व वॉर्ड बॉय हेच रुग्णांवर उपचार करायचे. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाला टाळे ठोकत महिलेवर शस्त्रक्रिया करणाऱ्या वॉर्डबॉयला अटक केली आहे.