'She' was on a woman ventilator and the wardenboy was with her ... Shocking type in a hospital in Jaipur

जयपूरच्या शॅल्बी रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी संध्याकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि तिची गुंगी पूर्णपणे उतरली नव्हती. शस्त्रक्रियेनंतर या महिलेला वेदना होत होत्या, मात्र भुलीचं इंजेक्शन दिल्यामुळे ती गुंगीतच होती. पीडित महिलेच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावण्यात आला होता. तसेच तिचे हातही बांधलेले होते. तिच्या या असहाय्यतेचा फायदा उचलत वॉर्डबॉयने तिच्या शरीराला अनेकवेळा नको तिथे स्पर्श केला. हा सगळा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

    जयपूर : व्हेंटीलेटरवर असलेल्या एका रुग्ण महिलेसोबत बॉर्डबॉयने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार जयपूरच्या रुग्णालयात घडला आहे. या वॉर्डबॉयची कामावरुन हाकलपट्टी करण्यात आली आहे.

    जयपूरच्या शॅल्बी रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी संध्याकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि तिची गुंगी पूर्णपणे उतरली नव्हती. शस्त्रक्रियेनंतर या महिलेला वेदना होत होत्या, मात्र भुलीचं इंजेक्शन दिल्यामुळे ती गुंगीतच होती.
    पीडित महिलेच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावण्यात आला होता. तसेच तिचे हातही बांधलेले होते. तिच्या या असहाय्यतेचा फायदा उचलत वॉर्डबॉयने तिच्या शरीराला अनेकवेळा नको तिथे स्पर्श केला. हा सगळा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

    महिला गुंगीत असली तरी तिला हे स्पर्श जाणवत होते. पूर्ण पणे शुद्धीत आल्यानंतर महिलेने तेथील नर्स आणि आपल्या पतीला या प्रकाराबाबत सांगीतले. यानंतर या वॉर्डबॉयची चौकशी केली असता त्यानेच हे कृत्य केल्याचे कबुल केले. महिलेच्या तक्रारीवरुन या वॉर्डबॉयला अटक करण्यात आली.