shetkryache nashib falfalale jivapad japlelya bailala milali lakhonchi kimmat sj

अजाप्पा कुरी यांनी मायाक्का चिंचणी येथील यात्रेतून खिलारी जातीचे वासरू १ लाख १ हजार रूपयांना खरेदी केल होते. त्याची योग्य निगा राखून जोपासना केली. परिणामी त्याची चर्चा लोकांमार्फत मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वरच्या दत्ता गराडे यांच्यापर्यंत पोहोचली.

बेळगाव : भारतात अजूनही कृषीप्रधान संस्कृती टिकून आहे. शेतीसाठी ट्रॅक्टरसह अन्य वाहने मदतीला असली तरी शेतकऱ्यांना आजही बैलाचा मोठा आधार आहे. तसेच बैलांना आता मोठ्या किंमती मिळत असल्याचेही प्रचंड उदाहरणे आहेत. असेच एक उदाहण रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथील कुरुकोडीमध्ये घडले आहे. कुरुकोडीमधील शेतकरी अजाप्पा पद्माण्णा कुरी यांच्या खिलारी जातीच्या बैलाला तब्बल ५ लाख १५ हजार रुपयांची बोली लागली आहे.

अजप्पा पद्माण्णा कुरी यांच्याकडून खिलाडी जातीचा बैल मंगळवेढा तालुक्यातील दत्ता ज्ञानेश्वर गराडे यांनी खरेदी केला आहे. शेतकऱ्याला मिळालेल्या किंमतीवरुन तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. जनावरांच्या बाजारात अनेक जातीवंत जनावरांना लाखो रुपयांच्या किंमती आता मिळत आहेत. अनेक शेतकरी मोठ्या किंमतीत जनावरांची खरेदी करत असता.

अजाप्पा कुरी यांनी मायाक्का चिंचणी येथील यात्रेतून खिलारी जातीचे वासरू १ लाख १ हजार रूपयांना खरेदी केल होते. त्याची योग्य निगा राखून जोपासना केली. परिणामी त्याची चर्चा लोकांमार्फत मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वरच्या दत्ता गराडे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी हारूगेरीला भेट दिली. बैलाला पाहून तब्बल ५ लाख १५ हजार रूपयांना खरेदी केली. शुक्रवारी या बैलाला सजविले आणि सवाद्य मिरवणूकही काढली. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.ॉ

“मायाक्का चिंचली यात्रेतून आणलेल्या वासराची आपणासह कुटुंबीयांनी १६ महिने निगा राखली. त्याला ५ लाख १५ हजाराची किंमत आली. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांना समाधान वाटत आहे.” असे बैलाचे पूर्व मालक अजाप्पा कुरी यांनी सांगितले तर “आमचे शेतकरी कुटुंब असून गोठ्यात जातीवंत १३ बैल आहेत. त्यातील एका बैलजोडीची किंमत १२ लाखांवर आहे. उर्वरीत बैल त्या खालोखालच्या किंमतीचे आहेत. केवळ छंद असल्याने गोठा जनावरांनी भरला आहे. त्यातून मिळणारे समाधान वेगळेच असल्याचे नवीन मालक दत्ता गराडे, नंदेश्वर यांनी म्हटले आहे.