girl tandav dance

यूट्यूबवर शिरूश्री सेकिया (Shirushree Saikia) हिचा एक व्हिडिओ(Viral Video) धुमाकूळ घालत आहे.या व्हायरल व्हिडिओमध्ये शिरूश्री सेकिया (Shirushree Saikia Dance Video) शिवतांडव स्तोत्रावर तांडव करताना दिसत आहे.

    यूट्यूबवर (YouTube) आपल्याला खूप वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यातही डान्सचे व्हिडिओ जास्त बघितले जातात. यूट्यूबवर शिरूश्री सेकिया (Shirushree Saikia) हिचा एक व्हिडिओ(Viral Video) धुमाकूळ घालत आहे.

    या व्हायरल व्हिडिओमध्ये शिरूश्री सेकिया (Shirushree Saikia Dance Video) शिवतांडव स्तोत्रावर तांडव करताना दिसत आहे. शिरूश्री सेकियाच्या (YouTuber Shirushree Saikia) डान्स करण्याच्या स्टाईलवरून तिच्या नृत्यातील नैपुण्याची जाणीव होते.तिचे हावभाव तर खूप लक्षवेधी आहेत. या व्हिडिओची संकल्पना आणि कोरियोग्राफी दोन्ही शिरूश्री सेकिया हिचीच आहे. हा व्हिडीओ १६ लाखांपेक्षा जास्त वेळा बघितला गेला आहे.

    शिरूश्री सेकिया (Shirushree Saikia) हिच्या या डान्स व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिच्या एनर्जी लेव्हलचे कौतुक करत आहेत. शिव तांडवस्तोत्रावरचा हा सगळ्यात चांगला डान्स असल्याचे काहींनी म्हटले आहे. हे नृत्य बघताना एका क्षणासाठीही नजर दुसरीकडे वळत नाही असेही काहींनी म्हटले आहे.