Shocking blow to Congress in Telangana; Big leader in Congress leaves party for 40 years; Took admission in BJP

हैदराबाद :  तेलंगणामध्ये काँग्रेसला जबरदस्त झटका बसला आहे. ४० वर्षे काँग्रसेमध्ये असलेल्या एका बड्या नेत्याने पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश घेतला  आहे.

तेलंगणामधील काँग्रेस नेते गुडूर नारायण रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. भाजपचे अन्य बडे नेतेही यावेळी उपस्थित होते.  गुडूर नारायण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिल्यानंतर भाजपत प्रवेश केला आहे.

गुडूर नारायण यांनी तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोशाध्यक्ष म्हणूनही राजीनामा दिला होता. ते जवळपास चार दशके म्हणजे ४० वर्षे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला.

हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.१५० प्रभागातील ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत तेलंगणाच्या सत्ताधारी टीआरएसने  ५५ जागा जिंकल्या आहेत. तर, भाजप हा दुसरा पक्ष म्हणून उदयास आला असून भाजपने ४८ प्रभागांमध्ये विजय मिळवला आहे. एआयएमआयएमने ४४ तर काँग्रेसने दोन जागा जिंकल्या आहेत.