धक्कादायक! खाण खचल्याने मध्यप्रदेशात सहा जणांचा मृत्यू

शहडोल - मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यात खाण खचल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्याच्या पपरेजी गावात घडली. या

 शहडोल –  मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यात खाण खचल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्याच्या पपरेजी गावात घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, अजून सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या गंभीर दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकरणाची चाचपणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, खाणीतून येथील नागरिक चुनखडी काढत असताना, माती खचली. त्यामुळे ते मातीच्या ढिगाऱ्यात गाडले गेले.  अजून दहा कामगार या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती निर्माण झाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या धक्कादायक प्रकरणात दोन महिलांचा समावेश असून, जखमींना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना ५ हजार रूपयांची तातडीने मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, या  अपघातानंतर खाण क्षेत्र बंद करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.