प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

उत्तरप्रदेशातील कौशांबीच्या जिल्हा रुग्णालयात एका नवजात बाळाचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्मर मशीनचे हीटिंग पॅड खूप गरम झाले होते. तशा गरम पॅडवर त्या बाळाला ठेवल्याने त्याची छाती आणि पोटावरची कातडी पूर्णपणे भाजून शरीरातून धूर आला. यात त्या बाळाचा जागीच मृत्यू झाला.

    कौशांबी : उत्तरप्रदेशातील कौशांबीच्या जिल्हा रुग्णालयात एका नवजात बाळाचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्मर मशीनचे हीटिंग पॅड खूप गरम झाले होते. तशा गरम पॅडवर त्या बाळाला ठेवल्याने त्याची छाती आणि पोटावरची कातडी पूर्णपणे भाजून शरीरातून धूर आला. यात त्या बाळाचा जागीच मृत्यू झाला.

    फतेहपूरच्या हरिश्चंद्रपूर गावातील रहिवासी जुनैद अहमदने पत्नी मेहिलिकाला प्रसुती वेदान झाल्यानंतर 14 ऑगस्टला जिल्हा रुग्णालयात भरती केले होते. सायंकाळी 6.15 वाजता मेहिलिकाने एका मुलाला जन्म दिला. बाळाची प्रकृती ठीक नसल्याचे सांगत डॉक्टरांनी बाळाला एसएनसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट केले. एसएनसीयू वॉर्डातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वॉर्मर मशीनवर ठेवलेल्या बाळाचा भाजून मृत्यू झाला.

    बॉटम पेज 12