rape

प्रत्येकवेळी नवा माणूस अमानवीय पद्धतीने तिच्यावर अत्याचार करीत राहिला. एवढंच नाही तर ती जेव्हा आपल्या मामाच्या घरी गेली होती, तिथेही तिच्या काही नातेवाईकांनी तिच्यावर बलात्कार केला. या कामी तिच्या आजीने त्यांना मदत केल्याचा आरोपही तिने केला आहे. नातेवाईकांनी तिला विकण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

  ललितपूर-  उ. प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने, आपल्या पित्यासह कुटुंबातील २८ जणांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत सपा आणि बसपाच्या काही नेत्यांचीही नावे आहेत. गेले काही वर्षांपासून तिला वासनेची शिकार बनवत असल्याचा आरोप या तरुणीने केला असून, पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.

  एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी सहावीत असताना, तिच्या पित्याने पॉर्न फिल्म दाखवत तिच्याशी शारिरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या मुलीने त्याला विरोध केला. त्यानंतर पित्याने या मुलीला नवे कपडे घेऊन दिले, आणि गाडी शिकवण्याच्या बहाण्याने दूर नेऊन शेतात तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात कुणाला काही सांगितले तर आईला मारुन टाकण्याची धमकीही या नरादम बापाने दिली होती.

  त्यानंतर शाळेतून परतत असताना, या नराधम बापाने या मुलीला एका हॉटेलात नेले. खाण्यात काही नशेचे पदार्थ मिसळण्यात आले होते. त्यानंतर या मुलीला एका महिलेच्या हवाली करण्यात आले. या महिलेने तिला एका खोलीत नेऊन झोपवले. ती शुद्ध असताना एकजण त्या खोलीत आला. जेव्हा या पीडित मुलीला जाग आली तेव्हा तिचे कपडे अंगावर नव्हते आणि तिच्या पोटात खूप दुखत होते. तिने नोंदवलेल्या तक्रारीनुसार हे बलात्कार सातत्याने घडत राहिले.

  प्रत्येकवेळी नवा माणूस अमानवीय पद्धतीने तिच्यावर अत्याचार करीत राहिला. एवढंच नाही तर ती जेव्हा आपल्या मामाच्या घरी गेली होती, तिथेही तिच्या काही नातेवाईकांनी तिच्यावर बलात्कार केला. या कामी तिच्या आजीने त्यांना मदत केल्याचा आरोपही तिने केला आहे. नातेवाईकांनी तिला विकण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

  या पीडित तरुणीचा नराधम बाप हा क ट्रक ड्रायव्हर आहे. या मुलीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी याची गांभिर्याने दखल घेतली असून, या प्रकरणी तिची मेडिकल टेस्टही करण्यात आली आहे. तिचा जबाब नोंदवण्यात आला असून,ने दिलेल्या तक्रारीनुसार मुलीचा बाप, सपाचा जिल्हाध्यक्ष, सपाचा शहराध्यक्ष, बसपाचा जिल्हाध्यक्षांसोबत इतर काही जणांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

  पॉक्सो कायद्यासह इतर पाच ते सहा गुन्हे यांच्याविरोधात दाखल करण्यात आले आहेत. आता या तरुणीला न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.