ममता बॅनर्जींची पिछेहाट करणारे कोण आहेत शुवेंदू अधिकारी ; जाणून घ्या

शुवेंदू अधिकारी यांनी नंदिग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळ पासून सुरू असलेल्या मत मोजणीमध्ये शुवेंदू पहिले तीन तास मतमोजणीत ते आघाडीवर असलेले दिसून आले आहे. ममतांना मागे टाकणारा नेता म्हणून त्याची ओळख बनत चालली आहे. नेमके कोण आहेत शुवेंदू अधिकारी.

  कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये मत मोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपने पूर्ण ताकदीनिशी दिलेल्या लढ्यामुळे येथील निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. अश्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी व ममता दीदी यांच्यापेक्षाही शुवेंदू अधिकारी सर्वाधिक चर्चेत आले आहेत, नेमके कोण आहेत शुवेंदू जाणून घ्या.

  – तृणमूल काँग्रेसमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून शुवेंदू अधिकारी ओळखले जात होते, मात्र गतवर्षी डिसेंबरमध्ये शुवेंदू यांनी ११ आमदार बरोबर घेत तृणमूलला रामराम ठोकला. अन भाजपामध्ये प्रवेश केला.

  शुवेंदू यांचे वडील शिशिर अधिकारी हे तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. तसेच ते खासदारही होते., मात्र शुवेंदू दोन्ही मुलांनी वडिलांसोबत भाजप मध्ये प्रवेश केला. तर तृणमूल काँग्रेसचा खासदार असलेल्या दिव्येंदू अधिकारीने मोदीच्या सभेला उपस्थित राहत वडिलांना पाठींबा दिला.

  – आताच्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळ पासून सुरू असलेल्या मत मोजणीमध्ये शुवेंदू पहिले तीन तास मतमोजणीत ते आघाडीवर असलेले दिसून आले आहे. ममतांना मागे टाकणारा नेता म्हणून त्याची ओळख बनत चालली आहे.

  – यापूर्वीही नंदीग्राममध्ये प्रचार दरम्यान ममता बॅनर्जींना अपघात होऊन पाय फ्रॅक्चर झाला. आपल्यावर हल्ला करत अपघात घडवून आणला असा आरोप ममतांनी आपल्या विरोधकांवर आरोप केले. त्यावेळीही शुवेंदू अधिकारी चर्चेत आले होते.