Side effects of love Danger in love; Boyfriend becomes "Bewafa Chaiwala"

वेगवेगळ्या चहासाठी वेगवेगळ्या किमती हे त्याच्या दुकानाचे वैशिष्ट्य आहे.  या दुकानात प्रेमी युगुल चहा पिण्यासाठी आलं तर त्या जोडप्याला २० रुपयात चहा दिला जातो.  ज्याचा प्रेमभंग झाला असेल त्याला १५ रुपयात चहा दिला जातो.

मुंबई : ब्रेकअपच्या दुख: पेक्षा मोठ दुख: काय? प्रेमभंग झालेला व्यक्तीच हे सांगू शकतो. ब्रेक झाल्यानंतर अनेकजण देवदास बनतात. तर, कुणी शायर होतात. तुटलेलं हृदय घेऊन जगणं अनेकांसाठी खरोखरच मुश्कील होते. पण, प्रेमात धोका मिळालेला एक तरुण चायवाला बनला आहे. तो नुसता चायवाला नाही तर “बेवफा चायवाला” बनला आहे.

मध्य प्रदेशाती हा “बेवफा चायवाला” सध्या सोशल मिडीयावर चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आहे. दीपक परिहार या तरुणाने “बेवफा चायवाला”  चहाचे दुकान टाकले आहे.

दीपक याची एक प्रेयसी होती आणि तिने त्याच्याशी असलेल्या नात्यात विश्वासघात केला. त्याचा प्रेमभंग झाला आणि त्या दुःखात त्याने चहाचं दुकान सुरू केलं. त्याने त्याच्या या चहाच्या दुकानाला नावही बेवफा चायवाला असं दिलं आहे.  दूरदूरवरुन अनेक जण त्याच्या या बेवफा चायची चुस्की घेण्यासाठी येतात.

वेगवेगळ्या चहासाठी वेगवेगळ्या किमती हे त्याच्या दुकानाचे वैशिष्ट्य आहे.  या दुकानात प्रेमी युगुल चहा पिण्यासाठी आलं तर त्या जोडप्याला २० रुपयात चहा दिला जातो.  ज्याचा प्रेमभंग झाला असेल त्याला १५ रुपयात चहा दिला जातो.

सध्या या चहावाल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. प्रेमभंगाच्या दुःखात त्याने  सुरू केलेले चहाचं दुकान सध्या चांगलच फार्मात आहे.