भावाला वाचवायला गेली अन् प्राण गमावून बसली, त्या बहिणीच्या दुर्दैवी मृत्यूची घटना ऐकून सगळेच हळहळले

संकटात भावाला वाचवायला गेलेल्या बहिणीला प्राणाशी मुकावं(Sister Died on The Spot) लागलं. या घटनेनं सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

    धर्मशाला : आपला भाऊ संकटात असल्याचं पाहून त्याची बहीण त्याला वाचवण्यासाठी गेली. मात्र आलेल्या संकटात भावाला वाचवायला गेलेल्या बहिणीला प्राणाशी मुकावं(Sister Died on The Spot) लागलं. या घटनेनं सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.रस्त्याचं काम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली.

    हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर (Bilaspur) गावात ही दुर्घटना घडली. धर्मशाळा जिल्ह्यातील हरिपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात हा परिसर येतो. एक लहान मुलगा रस्त्याचं काम सुरू असताना खेळताना मोठ्या मशीनजवळ गेला होता.

    भाऊ मशीनजवळ पोहचल्याचे पाहून त्याची १९ वर्षांची बहीण त्याच्याजवळ धावत गेली. तोपर्यंत हा मुलगा मशीनच्या बराच जवळ पोहोचला होता. तिनं कसं-बसं त्याला  माग ओढलं आणि दोघेही मागे येणार इतक्यात तिची ओढणी मशीनमध्ये अडकली. त्यानंतर तिचे केसही मशीनमध्ये अडकले. त्यामुळे तिनं जोरात आरडाओरडा केला, मात्र काही क्षणात ती मशीनमध्ये ओढली गेली. आरडाओरडा ऐकून धावत आलेल्या काहींनी मशीन बंद केली आणि तिला बाहेर घेऊन दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितले.

    आपल्या भावाला वाचवणाऱ्या बहिणीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यानं अनेकांनी शोक व्यक्त केला.