रेल्वेखाली बसून नटबोल्ट कसत होता; अचानक गाडी सुरू झाली आणि… ; व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) चंदौली (Chandauli) जिल्ह्यातील पंडीत दीनदयाल उपाध्याय (PDDU) जंक्शनवर ट्रेनच्या एक्सल नट-वोल्ट तपासत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ चिंता वाढवणारा आहे. ट्रेनच्या खाली जाऊन एक रेल्वे कर्मचारी (Railway Staff) काम करीत होता.

    चंदौली (Chandauli). उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) चंदौली (Chandauli) जिल्ह्यातील पंडीत दीनदयाल उपाध्याय (PDDU) जंक्शनवर ट्रेनच्या एक्सल नट-वोल्ट तपासत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ चिंता वाढवणारा आहे. ट्रेनच्या खाली जाऊन एक रेल्वे कर्मचारी (Railway Staff) काम करीत होता. तेव्हा अचानक ट्रेन सुरू झाली. कर्मचाऱ्याच्या डोक्यावरुन ट्रेन जात होती. यानंतर तोही पुरता घाबरला.

    सुदैवाने या प्रकाराला कोणीही जखमी झालेलं नाही. रविवारी रेल्वे कर्मचाऱ्याच्या डोक्यावरुन ट्रेन गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर रेल्वे प्रशासनावर टीका केली जात आहे. हा निष्काळजीपणा असून यातून कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. हल्दियामधून आनंद विहारला जाणारी विशेष ट्रेन गुरुवारी रात्री दहा वाजता स्थानिक रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म सहावर पोहोचली.

    तपासादरम्यान कॅरेज अँड वॅगन विभागातील कर्मचाऱ्यांनी ट्रेनच्या स्लीपर कोच एस-5 च्या खाली हाट एक्सलचा नट ढिला झाल्याचे दिसलं. त्यानंतर दोन कर्मचारी कोचच्या खाली जाऊन ते काम करू लागले. यादरम्यान ट्रेन सुरू झाली. यानंतर स्वत:ला वाचविण्यासाठी कर्मचारी रेल्वे ट्रॅकच्या खाली आडवे झाले. येथील अन्य कर्मचाऱ्यांनी धावत जाऊन ट्रेनमध्ये जाऊन साखळी ओढली.