... so a staggering five lakh notes were burned on the gas; Shocking type in Telangana

एसीबीने वेंकटय्याच्या घरी छापा टाकला. दारावर एसीबीचे अधिकारी आल्याचे पाहून वेंकटय्याची घाबरगुंडी उडाली. एसीबीच्या जाळ्यात अडकण्याच्या भीतीने वेंकटय्याने थेट किचनमधला गॅस पेटवला आणि 5 लाखांची रोकड गॅसवर ठेऊन दिली. पण यामुळे पुरावे नष्ट करण्याचा वेंकटय्याचा हेतू मात्र साध्य होऊ शकला नाही. एसीबीने अखेर घरात शिरून जळणाऱ्या 5 लाखांच्या नोटा विझवल्या. त्यामध्ये तब्बल 92 हजार रुपयांच्या 2 हजाराच्या 46 नोटा पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसून आले.

    हैदराबाद :  तेलंगाणामध्ये एका व्यक्तीने छापेमारीच्या भीतीने लाच म्हणून घेतलेले 5 लाख जाळल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण तेलंगाणाच्या नागरकुर्नूल जिल्ह्याचे आहेत. येथे एका एका तहसीलदाराच्या सांगण्यावरून 5 लाखांची रोकड लाच म्हणून ठेवून घेतलेल्या एका व्यक्तीने ही सगळी रोकड गॅसवर पेटवून दिल्याचा घडला आहे. इथेही एसीबीने धाड टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समजते

    तेलंगणाच्या नागरकुर्नूल जिल्ह्यामध्ये वेलदांडाचा तहसीलदार सैदुलुने वेंकटय्या गौड नावाच्या व्यक्तीला 5 लाख रुपये ठेऊन घ्यायला सांगितले होते. या तहसिलदाराने एका कामाला एनओसी देण्यासाठी संबंधिताकडून ही 5 लाखांची रक्कम लाच म्हणून घेतली होती. त्यामुळे ठरल्यानुसार संबंधित व्यक्तीने 5 लाख रोख गौडकडे दिले होते. मात्र, एसीबीला याची खबर लागली आणि या सगळ्या प्रकरणात ट्वीस्ट आला.

    एसीबीने वेंकटय्याच्या घरी छापा टाकला. दारावर एसीबीचे अधिकारी आल्याचे पाहून वेंकटय्याची घाबरगुंडी उडाली. एसीबीच्या जाळ्यात अडकण्याच्या भीतीने वेंकटय्याने थेट किचनमधला गॅस पेटवला आणि 5 लाखांची रोकड गॅसवर ठेऊन दिली. पण यामुळे पुरावे नष्ट करण्याचा वेंकटय्याचा हेतू मात्र साध्य होऊ शकला नाही. एसीबीने अखेर घरात शिरून जळणाऱ्या 5 लाखांच्या नोटा विझवल्या. त्यामध्ये तब्बल 92 हजार रुपयांच्या 2 हजाराच्या 46 नोटा पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसून आले.

    त्याशिवाय, 500 रुपयांच्या आणि 2 हजार रुपयांच्या काही नोटा काही प्रमाणात जळालेल्या अवस्थेत एसीबीच्या अधिकाऱ्यांना आढळून आल्या. या प्रकारानंतर एसीबीने वेंकटय्या गौड आणि संबंधित तहसीलदार सैदुलु या दोघांनाही अटक केली असून या प्रकरणात पुढील तपास सुरू केला आहे.

    राजस्थानमध्ये एका तहसीलदाराने दारावर एसीबी अर्थात भ्रष्टाचारविरोधी पथकाचे अधिकारी आलेले पाहताच 15 ते 20 लाखांच्या नोटा जाळून टाकल्या होत्या. तसाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा तेलंगणामध्ये घडला आहे.