… तर त्यांना शहीद कसे म्हणायचे? लेखिकेची वादग्रस्त फेसबुक पोस्ट

शिखा सरमा या लेखिकेने फेसबुकवर लिहिले होते की, पगार घेणारे कामगार जर ड्यूटीवेळी मरत असतील तर त्यांना शहीद कसे बोलू शकतो. याच लॉजिकनुसार जर वीज विभागातील कर्मचारी जो करंट लागून मृत्युमुखी पडतो त्यालाही शहीद म्हटले पाहिजे. मीडियाच्या लोकांनी भावूक बनू नये असे या लेखिकेने म्हटले आहे. शिखा सरमाची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियात चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. मोठ्या संख्येने लोक याचा विरोध करत आहे. गुवाहाटी हायकोर्टाचे वकील उमी डेका बरुआ आणि कंगकना गोस्वामी यांनी दिसपूर पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात FIR नोंदवली आहे. तक्रारकर्त्यांनी शिखाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिखाचे विधान हे शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. ही पोस्ट राष्ट्र भावनेतून सेवा करणाऱ्यांवर हल्ला आहे. दिसपूर पोलिस स्टेशनने याबाबत तक्रार नोंदवून घेत शिखा सरमाला अटक केली आहे.

  रायपूर :  छत्तीसगडमध्ये अलिकडेच झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे 22 जवान शहीद झाले आहेत. देशातील प्रत्येक नागरिक या घटनेचा निषेध करून नक्षलींविरोधात सरकारने कडक कारवाई करण्याची मागणी करत आहे. यातच आसाममधील एका 48 वर्षीय लेखिकेने जवानांच्या बलिदानावर फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केली. त्यानंतर या लेखिकेला देशद्रोहासह अन्य आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गुवाहाटी पोलिस आयुक्त मुन्ना प्रसाद गुप्ता म्हणाले की, लेखिका शिखा सरमा यांच्यावर विविध कलमे ज्यात आयपीसी 124 अ(देशद्रोह) याचाही समावेश आहे.

  सोशल मीडियावर चर्चा

  शिखा सरमा या लेखिकेने फेसबुकवर लिहिले होते की, पगार घेणारे कामगार जर ड्यूटीवेळी मरत असतील तर त्यांना शहीद कसे बोलू शकतो. याच लॉजिकनुसार जर वीज विभागातील कर्मचारी जो करंट लागून मृत्युमुखी पडतो त्यालाही शहीद म्हटले पाहिजे. मीडियाच्या लोकांनी भावूक बनू नये असे या लेखिकेने म्हटले आहे. शिखा सरमाची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियात चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. मोठ्या संख्येने लोक याचा विरोध करत आहे. गुवाहाटी हायकोर्टाचे वकील उमी डेका बरुआ आणि कंगकना गोस्वामी यांनी दिसपूर पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात FIR नोंदवली आहे. तक्रारकर्त्यांनी शिखाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिखाचे विधान हे शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. ही पोस्ट राष्ट्र भावनेतून सेवा करणाऱ्यांवर हल्ला आहे. दिसपूर पोलिस स्टेशनने याबाबत तक्रार नोंदवून घेत शिखा सरमाला अटक केली आहे.

  चर्चेसाठी मध्यस्त…तरच सुटका

  छत्तीसगडमध्ये माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या आणि ‘कोब्रा’ टीमचे कमांडो राकेश्वर सिंह यांचा एक फोटो समोर आला आहे. राकेश्वर सिंह हे आपल्या ताब्यात असल्याचा दावा माओवाद्यांनी बीजापूरचे पत्रकार गणेश मिश्र यांच्याशी बोलताना केलाय. नक्षलवाद्यांनी गणेश मिश्र यांना कमांडर राकेश्वर सिंह यांच्या फोटोसोबत एक पत्र पाठवून आपल्या अटीही समोर मांडल्या आहेत. बुधवारी सकाळी माओवाद्यांनी माझ्याशी फोनवरून संपर्क साधला. राकेश्वर सिंह हे आमच्या ताब्यात सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. पुराव्यासाठी त्यांनी राकेश्वर सिंह यांचा एक फोटोही पाठवला आहे, असे गणेश मिश्र यांनी म्हटले. माओवाद्यांकडून पाठवण्यात आलेल्या फोटोत राकेश्वर सिंह कॅम्पमध्ये बसलेले दिसत आहेत. बेपत्ता झाल्यानंतर राकेश्वर सिंह यांचा हा पहिलाच फोटो आहे. आपल्याशी चर्चा करण्यासाठी सरकारने मध्यस्थांना पाठवावे, तेव्हाच राकेश्वर मिश्र यांची सुटका केली जाईल, असे या पत्रात माओवाद्यांनी म्हटले.

  कुटुंबीयांची सरकारकडे याचना

  दुसरीकडे, जम्मूचे रहिवासी असणाऱ्या राकेश्वर सिंह मनहास यांच्या कुटुंबाने सरकारकडे याचना केली. लवकरात लवकर पावले उचलून सरकारने राकेश्वर सिंह यांची सुटका करावी, अशी मागणी त्यांची पत्नी मीनू मनहास यांनी केली. जर एखाद्या जवानाने सुटी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीही रिपोर्ट केला तर त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाते. इथे एक जवान 3 एप्रिलपासून बेपत्ता आहे परंतु, सरकार मात्र कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. सरकारने मध्यस्थांना पाठवून राकेश्वर सिंह यांची सुटका करावी, असेही त्यांनी म्हटले. मात्र, माओवाद्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. या दाव्यांच्या सत्यतेची पडताळणी सुरू असल्याचे सुरक्षा दलाकडून सांगण्यात येत आहे.