so the husband was keeping a safe distance; Suspicious of taking his wife

भोपाळ : कोरोना टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत.  मात्र, लग्नानंतरही या नियमाचे पालन करणे एका पतीला चांगलेच महागात पडले. नुकतेच लग्न झालेला पती सोशल डिस्टन्सिंग (Social distancing) ठेवत असल्याने रागवलेल्या पत्नीने थेट कोर्टात धाव घेतली.

कोरोना व्हायरसच्या (COVID19) भीतीने मानवी नातेसंबंधांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे.  लॉकडाऊनमध्ये (Lockdown) बराच काळ एकाकी राहिल्याने  मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळमध्ये (Bhopal) कोरोना फोबियामुळे एक विचित्र पेच निर्माण झाला.

या प्रकरणातील जोडप्याचे २९ जून रोजी लग्न  झाले होते. त्यांचे लग्न होण्याच्या काळात सर्वत्र कोरोना व्हायरसची दहशत होती. या दहशतीमुळेच पतीने पत्नीच्या जवळ जाणे टाळले.  पतीच्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवण्याच्या धोरणाला पत्नी कंटाळली. यामुळे रागावलेल्या पत्नीने सासर सोडले आणि थेट माहेर गाठले. त्यानंतर पत्नीने नवऱ्याच्या विरोधात कोर्टात धाव घेतली.

लग्नानंतर पती फोनवर चांगला बोलतो पण जवळ येत नाही अशी महिलेची तक्रार होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. तक्रारदार पत्नीच्या माहेरच्या मंडळीने हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांना यश आले नाही. पतीची उदासीनता आणि त्याचबरोबर सासरची मंडळी देखील छळ करतात असा आरोप करत ‘त्या’ महिलेने कोर्टात धाव घेतली. आपल्यापुढे सर्व आयुष्य बाकी असून नवऱ्याने आपल्या पालण-पोषणाचा खर्च द्यावा अशी मागणी तिने कोर्टात केली.

कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना तक्रारदार महिलेच्या नवऱ्याला मेडिकल रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले. कोर्टानं आदेश दिल्यानंतर पतीला पुरुषत्वाचेही प्रमाणपत्र कोर्टात सादर करावे लागले . अखेर मेडिकल रिपोर्ट समोर आल्यानंतर तक्रारदार महिलेचा संशय दूर झाला. त्यानंतर ती नवऱ्यासोबत सासरी जाण्यास तयार झाली. दरम्यान कोर्टाने या जोडप्याला कोरोना फोबिया दूर करण्यासाठी कोव्हिड टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.