… तर दुसऱ्यांनी पोटात दुखवून घेण्याचं काय कारण?; रावसाहेब दानवेंचं वक्तव्य

काँग्रेसने स्वबळाची भाषा करणं स्वाभाविक आहे. कारण ते सरकार एकत्र चालवतात. त्यांनी पक्ष एकमेकांमध्ये विलीन केलेले नाहीत. ते सरकार एकत्र चालवतात, पक्ष मात्र वेगळे चालवतात. मग जर तसं असेल तर त्यांना आपापले पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मग आता येणाऱ्या निवडणुका एकत्र लढायच्या का स्वबळावर लढायच्या हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.त्यामुळे काँग्रेस स्वबळाची भाषा करत असेल, तर दुसऱ्यांनी पोटात दुखवून घेण्याचं काय कारण आहे?, असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला आहे. जेव्हापासून काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तेव्हापासून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच यावर भाजप पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी एक वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीचा जन्मच मुहर्तावर झालेला नाही, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

    दानवे नेमकं काय म्हणाले?

    रावसाहेब दानवे यांनी काल पीकविम्याची मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडी ज्या दिवशी निर्माण झाली तेव्हापासून त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे वाद अगदी सुरुवातीपासूनच आहेत. कधी वादळ येतं, कधी ते शमवलं जातं. पण पुन्हा वादळ येतंच, असं त्यांनी म्हटलं आहे. जरी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला असला तर, त्यांनी देशात काँग्रेसची सरकारं किती याचा काँग्रेसवाल्यांनी विचार करायला हवा, असं म्हणत दानवेंनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.