चीनवर प्रहार करण्यासाठी एलएसीवरील तैनात जवानांना मिळणार घातक अमेरिकन हत्यार

अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्सच्या करारामधील पहिल्या ७२ हजार रायफल्स भारतात आल्या आहेत. आता लष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कराला आपल्या दहशताविरोधी अभियानासाठी सि सॉयर असॉल्ट रायफलचा पहीला शस्त्रसाठा मिळाला आहे.

 नवी दिल्ली : चिनी सैन्याने लडाखमध्ये (Ladakh) केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लडाखमधील एलएसीवर (LAC) कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तसेच सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न करणाऱ्या चीनसमोर भारताने (Indian) आपले लष्कर उभे केले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या या जवानांना आता अमेरिकन (American weapons ) सिग सॉलर असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.

अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्सच्या करारामधील पहिल्या ७२ हजार रायफल्स भारतात आल्या आहेत. आता लष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कराला आपल्या दहशताविरोधी अभियानासाठी सि सॉयर असॉल्ट रायफलचा पहीला शस्त्रसाठा मिळाला आहे.

भारताने फास्ट ट्रॅक खरेदी कार्यक्रमांतर्गत या रायफल्स खरेदी केल्या होत्या. नव्या रायफल्सना सध्याच्या भारतीय स्मॉल आर्म्स सिस्टिम रायफलमधून बदलण्यात येईल. या राय़फल्सचा वापर सध्या भारतीय सुरक्षा बलाकडून करण्यात येत आहे.