भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी; मध्य प्रदेशातून दोन महिलांना अटक

मध्यप्रदेशातील इंदूरजवळ लष्करी छावणी महूमध्ये लष्करी हेरगिरीच्या आरोपाखाली दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोघी बहिणी आहेत आणि त्या इंदूरमध्ये राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून त्या पाकिस्तानातील व्यक्तींशी संपर्कात होत्या आणि लष्करी छावणीबद्दलची माहिती त्या याठिकाणी पोहोचवत होत्या.

    भोपाळ : मध्यप्रदेशातील इंदूरजवळ लष्करी छावणी महूमध्ये लष्करी हेरगिरीच्या आरोपाखाली दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोघी बहिणी आहेत आणि त्या इंदूरमध्ये राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून त्या पाकिस्तानातील व्यक्तींशी संपर्कात होत्या आणि लष्करी छावणीबद्दलची माहिती त्या याठिकाणी पोहोचवत होत्या.

    काही दिवसांपूर्वी या महिला रस्त्यावर चालताना फोनवर बोलत होत्या. याचवेळी सैन्याच्या गुप्त विभागाने त्यांची फ्रिक्वेंसी पडकली. यानंतर या दोघींवरही सतत नजर ठेवण्यात आली.

    चार दिवसांपूर्वी इंटेलिजन्स ब्युरो, एटीएस आणि स्थानिक सैन्य गुप्तचर विभागाच्या पथकाने या दोघींच्या घरावर छापा टाकला. यानंतर इथे अनेक वाहने येत राहिल्याने लोकांना संशय आला. यामुळे, ही बातमी समोर आली. आता राष्ट्रीय इन्वेस्टिगेशन एजन्सीही त्यांची चौकशी करू शकते.