Storm firing on Assam-Mizoram border; Six policemen were killed and Marathmole police officer Vaibhav Nimbalkar was injured

मागील काही दिवसांत आसाम आणि मिझोरम राज्यांमधील तणाव वाढला आहे. यातूनच सोमवारी दोन्ही राज्यांकडून दगडफेक करण्यात आली. आसाममधखील बराक घाटी परिसरातील कछार, करीमगंज आणि हाईलकांडीची 164 किमीची सीमा मिझोरम राज्यातील आईजोल, कोलासीब आणि मामित जिल्ह्यांना लागते. जमीनीच्या कारणावरुन ऑगस्ट 2020 पासून आतंरराज्य सीमेवर संघर्ष सुरु झाला आहे.

    नवी दिल्ली: आसाम-मिझोराम सीमावाद अधिकच चिघळला आहे. सीमावादातून झालेल्या हिंसाचारात सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर मराठमोळे पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गोळी लागली आहे.

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीटद्वारे या वादाबाबतची माहिती दिली. मराठमोळे अधिकारी वैभव निंबाळकर हे आसामच्या पोलीस दलात कछार जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. मिझोरममधील गटाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर यांच्या पायात गोळी लागली. निंबाळकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    मागील काही दिवसांत आसाम आणि मिझोरम राज्यांमधील तणाव वाढला आहे. यातूनच सोमवारी दोन्ही राज्यांकडून दगडफेक करण्यात आली. आसाममधखील बराक घाटी परिसरातील कछार, करीमगंज आणि हाईलकांडीची 164 किमीची सीमा मिझोरम राज्यातील आईजोल, कोलासीब आणि मामित जिल्ह्यांना लागते. जमीनीच्या कारणावरुन ऑगस्ट 2020 पासून आतंरराज्य सीमेवर संघर्ष सुरु झाला आहे. आसाम आणि मिझोरममधील आंतरराज्यीय सीमा वादावरुन दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.