Strange custom in a drinking village in the Manikarna valley of Himachal Pradesh

जगात अशा अनेक प्रथा आहेत जे ऐकून आपण आश्चर्यचकित होतो. भारतात एक ठिकाण असे आहे जिथे विवाहित महिला पाच दिवस कपडे घालत नाही. हे ऐकायला तुम्हाला विचित्र वाटेल, परंतु या पाच दिवसात येथील महिला कपडे न घालता राहतात. अनेक वर्षांपासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि अजून पर्यंत ही प्रथा पाळली जात आहे. ही प्रथा हिमाचल प्रदेशच्या मणिकर्ण घाटीतील पीणी गावात पाळली जाते.

    हिमाचल : जगात अशा अनेक प्रथा आहेत जे ऐकून आपण आश्चर्यचकित होतो. भारतात एक ठिकाण असे आहे जिथे विवाहित महिला पाच दिवस कपडे घालत नाही. हे ऐकायला तुम्हाला विचित्र वाटेल, परंतु या पाच दिवसात येथील महिला कपडे न घालता राहतात. अनेक वर्षांपासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि अजून पर्यंत ही प्रथा पाळली जात आहे. ही प्रथा हिमाचल प्रदेशच्या मणिकर्ण घाटीतील पीणी गावात पाळली जाते.

    या गावातील महिला वर्षातील 5 दिवस कपडे घालत नाहीत. विशेष म्हणजे यावेळी महिला पुरुषांसमोर येत नाही. श्रावन महिन्यामध्ये ही प्रथा केली जाते. पूर्वजांच्या काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे. असे म्हटले जाते की, या जर एखाद्या महिलेने ही प्रथा नाही पाळली तर घरामध्ये काही तरी अशुभ घटना घडते. यामुळे ही प्रथा पाळली जाते.

    काही लोकांचा असा विश्वास आहे की, काही वर्षांपूर्वी एका राक्षसाने सुंदर कपडे घातलेल्या स्त्रियांना पळवून नेण्यात आले होते. या राक्षसाला गावातील देवतांनी संपविले होते. म्हणून या 5 दिवसात महिलांना वैवाहिक जीवनापासून स्वत: ला लांब ठेवतात. परंतु, आताची पिढी ही प्रथा जरा वेगळ्या पद्धतीने करतात. या 5 दिवसांत महिला कपडे बदलत नाहीत आणि खूप पातळ प्रकारचे कपडे वापरले जातात.