Wandering exhausted to get an oxygen cylinder; Finally I slept under the Pimple tree and

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील अशी एक घटना समोर आली आहे की, ज्यामध्ये एका गावातील लोक घर सोडून पिंपळच्या झाडाखाली रात्रंदिवस राहतात आणि हे कोरोनाच्या भीतीमुळे घडले आहे. पिंपळाच्या झाडाखाली उभे राहिल्यास ऑक्सिजनची पातळी वाढते, असे या गावातील लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान, ही घटना आग्राच्या नौफरी गावातील आहे. येथील लोक पिंपळाच्या झाडाखाली बसून ऑक्सिजन घेत आहेत. सध्या येथील पिंपळाच्या झाडाखाली लोकांची प्रचंड गर्दी दिसत आहे.

    आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील अशी एक घटना समोर आली आहे की, ज्यामध्ये एका गावातील लोक घर सोडून पिंपळच्या झाडाखाली रात्रंदिवस राहतात आणि हे कोरोनाच्या भीतीमुळे घडले आहे. पिंपळाच्या झाडाखाली उभे राहिल्यास ऑक्सिजनची पातळी वाढते, असे या गावातील लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान, ही घटना आग्राच्या नौफरी गावातील आहे. येथील लोक पिंपळाच्या झाडाखाली बसून ऑक्सिजन घेत आहेत. सध्या येथील पिंपळाच्या झाडाखाली लोकांची प्रचंड गर्दी दिसत आहे.

    झाड बनले जीवनरक्षक

    गावातील शेकडो वर्ष जुन्या या पिंपळाच्या झाडाला लोक जीवनरक्षक म्हणत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या संख्येने लोक पिंपळाच्या झाडाखाली बसत आहेत. गावातील रहिवासी विनोद शर्मा यांनी पिंपळाच्या झाडावरच खाट ठेवली आहे. विनोद शर्मा यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी काही दिवसांपूर्वी कमी होती. लोकांनी त्यांना सल्ला दिल्यानंतर त्यांनी पिंपळाच्या झाडावरच खाट ठेवली आहे. गेल्या 15 दिवसांपासून विनोद शर्मा दररोज पिंपळाच्या झाडावर राहतात. विनोद शर्मा पिंपळाच्या झाडावर एक खाट ठेवून झोपतात आणि दिवसभर जवळपास 5 तास पिंपळाच्या झाडावर राहतात. विनोद शर्मा यांचा असा दावा आहे की, त्याची ऑक्सिजनची पातळी आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. केवळ विनोद शर्मा हेच नाही, तर गावातील अन्य गावकरीही पिंपळाच्या झाडाखाली बसलेले दिसतात.

    प्रकृतीत सुधारणा

    सकाळी गावातील लोक झाडाखाली व्यायाम करतात आणि योगा करतात. तसेच, दुपारी गावातील काही लोक या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपला वेळ घालवतात. पिंपळाच्या झाडाखाली बसून ऑक्सिजन घेत असलेले बऱ्याच लोकांना असे वाटते की, कोरोनामुळे ऑक्सिजनची पातळी कमी झाली, तेव्हापासून लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली बसण्यास सुरुवात केली आहे. लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली आहे. ऑक्सिजनची पातळीही लक्षणीय वाढली आहे. पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांना बराच दिलासा मिळाला आहे. तसेच, यामुळे लोकांची प्रकृती सुधारली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याशिवाय, पिंपळाच्या झाडाची मदत लक्षात घेता लोकांनी गावात पिंपळाच्या झाडाची लागवडही केली आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.