Strange story of a strange thief The thief who broke into the temple to steal tells the police, "Let him sleep. It's too cold."

शाजापुर : एका अजब चोराची गजब कहानी मध्य प्रदेशात उघडकीस आली आहे. चोरीच्या उद्देशाने मंदिरात घुसलेला एक चोर तेथील बिछाना पाहून मस्त झोपी गेला. सकाळी हा गाढ झोपी गेलेला चोर पोलिसांच्या हाती लागला.

पोलीस त्याला उठवत होते. तेव्हा त्याने  ‘झोपू द्या ना खूप थंडी आहे’  असे म्हटल्याने सर्वच अवाक झाले. मध्य प्रदेशमधील शाजापुर जिल्ह्यात प्राचीन लालबाई फुलबाई मंदिरात हा चोर चोरी करण्यासाठी आला होता.

रात्रीच्या सुमारास चोराने पुजाऱ्याच्या खोलीत असणाऱ्या त्रिशुळच्या मदतीने मंदिराचा दरवाजा तोडला. मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्याने देवीचे दागिने आणि येथील सर्व सामान एका बोचक्यात बांधले.

यानंतर त्याने पुजाऱ्याच्या खोलीतील अंथरुण पाहिले. उबदार बिछाना पाहून चोराला झोप आवरता आली नाही. पलायन न करताच तो बिछान्यावर आडवा झाला आणि मस्त ताणून दिली.

सकाळी पुजारी आला असता त्याला त्रिशुळ आपल्या जागेवर दिसले नाही आणि खोलीचा दरवाजा तुटलेला होता. पुजाऱ्याने तात्काळ पोलिसांना बोलावले. यावेळी गाढ झोपलेला चोर पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला असता त्याने मला झोपू द्या अशी रीघ ओढली.